Traffic Update : चिंचवडकरांनो लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद
Traffic Update : रमजान ईदनिमित्त नमाज पठणासाठी मोठी गर्दी अपेक्षित; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांचे महत्त्वाचे आदेश.

Traffic Update – रमजान ईद निमित्त चिंचवडगावातील चापेकर चौक येथील ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे निगडी वाहतूक विभागाने २१ मार्च रोजी (चंद्रदर्शनानुसार एक दिवस पुढे-मागे) सकाळी ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू केले आहेत. पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,
या कालावधीत चापेकर चौक परिसरातील प्रमुख रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता इतर सर्व वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
महत्वाचे बदल पुढीलप्रमाणे :
मरीआई माता मंदिर ते चापेकर चौक मार्ग बंद
-पर्याय : एसकेएफ कंपनीकडून अहिंसा चौक मार्गे किंवा सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मागील रस्ता
-चापेकर चौक ते मरीआई माता मंदिर मार्ग बंद
-पर्याय : जुना जकात नाका मार्गे सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल किंवा अहिंसा चौक मार्ग
-मोरया नगर ते चापेकर चौक मार्ग बंद
-पर्याय : हनुमान मंदिर येथून सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मार्ग





