खडकवासला – पुणे-पानशेत रस्त्यावरील ओसाडे व सोनापूर या गावांच्या शिवेवर मुख्य रस्त्यावर खासगी जागा मालकाने डोंगर उतारावर बांधलेली संरक्षक भिंत व दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दरड हटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी दिली आहे.
ओसाडे व सोनापूर या गावांच्या शिवेवर खासगी जागा मालकाने मुख्य रस्त्याला समांतर अशी डोंगर उतारावर संरक्षक भिंत बांधलेली होती. त्यात आतल्या बाजूने माती भरण्यात आलेली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने माती फुगुन भिंत पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भिंतीचे अवशेष, मुरुम, माती हे सर्व मुख्य रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवार असल्याने मोठ्या प्रमाणात आलेले पर्यटकही अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम सुरू केले आहे.
बाजार समिती उपसचिवपदी नितीन रासकर; भुसार विभागप्रमुखपदी प्रशांत गोते यांची नियुक्ती
ज्या ठिकाणी ही दरड कोसळली आहे तेथून जवळच काही दिवसांपूर्वी पूल खचलेला आहे. अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती दुरुस्ती केली आहे. मात्र पाऊस सुरू असल्याने धोका कायम आहे. पुलाच्या ठिकाणी एक जेसीबी मशीन आपत्कालीन मदत व बचाव कार्य करण्यासाठी रात्रंदिवस उभी ठेवण्यात आली आहे.
वाघोलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेची आमदारांकडून पाहणी