वडगाव ब्रिजखाली पाणीसाचल्याने वाहतूक कोंडी; पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने मार्ग मोकळा
Updated On:

पुणे : मुसळधार पावसामुळे सिंहगड रोड वाहतूक विभागाच्या हद्दीत वडगाव ब्रिजखालील ड्रेनेज व्यवस्था निकामी झाली. त्यामुळे स्वारगेट ते सिंहगड रोडमार्गे धायरी फाटा आणि नांदेड सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. परिणामी काही काळ वाहतूक संथ झाली आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून ड्रेनेज साफसफाईचे काम केले. पोलीस अंमलदार राऊत, नेहरकर आणि सरगर यांनी समन्वय साधत पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत केली. त्यांच्या तत्पर कार्यामुळे मोठा वाहतूक बोजा टळला.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या वेळी दाखवलेल्या तत्परतेचे आणि सेवाभावाचे कौतुक केले आहे.





