दिल्लीत मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पाणीसाठून वाहतूक विस्कळीत

नवी दिल्ली – शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीसाठून वाहतूक विस्कळीत झाली.
साकेत, मालवीय नगर, बुरारी, जीटीबी नगर, कैलास पूर्व, लाजपत नगर, कैलास हिल्स आणि मध्य दिल्ली येथे हलका ते मध्यम पाऊस पडला. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी ट्रॅफिक ऍलर्ट जारी करून प्रवाशांना त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्यास सुचवले आहे.
“आरेतील एकही झाड कापू नये”; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
दिल्ली, एनसीआर लोनी देहाटत, हिंडन एएफ स्टेशन, नोएडा, फरीदाबाद, बल्लभगड, मानेसर गुरुग्राम, राजौंद, असंध, सफिडॉन, पानिपत, गोहाना, गन्नौरच्या बहुतांश ठिकाणी आणि लगतच्या भागात गडगडाटी वादळासह हलक्या ते मध्यम तीव्रतेचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हा अंदाज पुढील दोन दिवसांसाठी आहे.
आमच्यावर कितीही दडपशाही झाली तरी लढा सुरूच राहणार – राहुल गांधी





