Tourist : निंदनीय ! गडावर विदेशी पर्यटकाला तंबाखू, गुटखा खायला शिकवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

पुणे : अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक असलेला आणि नारवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानाचे जीवंत स्मारक असलेल्या किल्ले सिंहगडावर एक दुर्दैवी (Tourist) प्रकार घडला होता. या ठिकाणी पुण्यातील काही टवाळखोरांनी कॅनडामधून (Tourist) आलेल्या एका पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावर शिव्या द्यायला शिकवले होतं. भाषेच्या अज्ञानामुळे आपण शिव्या देतोय याची पुसटशी शंका ही या विदेशी पर्यटकाला आली नाही. मात्र हा व्हिडिओ वायरल झाला आणि सगळीकडे संतापाची लाट उसळली.
हे पण वाचा : ‘’ट्रम्पसमोर झुकलो नाही तर…’, इराणच्या अधिकाऱ्यांनी दिला होता खामेनेई यांना ‘हा’ गंभीर इशारा
ही घटना ताजी असताना याच पर्यटकाबाबत अजून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा युट्युबर एलेन जंजिरा किल्ल्यावर पोचला तेव्हा तो एका तरुणाला भेटला , काही वेळ हा तरुण एलेन सोबत चालत होता ,नंतर तो थांबला आणि त्याने तंबाखू खाल्ली. ही गोष्ट जेव्हा एलेनने बघितली तेव्हा तरुणाने एलेनला चक्क तंबाखू मळून दिली आणि कशी खायची हेदेखील शिकवले.
तसेच धक्का दायक बाब म्हणजे महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा देखील आपल्याकडं असल्याचं हा तरुण त्या विदेशी पर्यटकाला (Tourist) सांगताना दिसत आहे. तरुणाने दिलेली तंबाखू युट्युबर एलेनने खाल्ली मात्र त्याला ती सहन झाली नाही. या घटनेनंतर एलेन तंबाखू देणाऱ्या मराठी तरुणा पासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अक्षरशः त्याला चकवा देऊन पळून गेल्याच देखील या व्हिडीओत बघायला मिळत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सगळ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. अनेक शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.





