‘’ट्रम्पसमोर झुकलो नाही तर…’, इराणच्या अधिकाऱ्यांनी दिला होता खामेनेई यांना ‘हा’ गंभीर इशारा

US-Iran nuclear talks | अमेरिका आणि इराण यांच्यात अणुकार्यक्रमासंदर्भात सध्या महत्त्वाची चर्चा नुकतीच पार पडली. ही बैठक ओमानच्या मस्कत शहरात आयोजित करण्यात आली होती. अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र उपमंत्री अब्बास अराकची या बैठकीत सहभागी झाले होते.
ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मध्यस्थीची भूमिका बजावत दोन्ही देशांना 19 एप्रिल रोजी पुढील टप्प्याच्या चर्चेसाठी तयार केलं आहे. रिपोर्टनुसार, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आधी या चर्चेसाठी तयार न्हते. मात्र, इराणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्यानंतर ते यासाठी तयार झाले.
इराणच्या वरिष्ठ अदिकाऱ्यांनी खामेनेईंना थेट इशारा दिला होता की, “जर आपण ट्रम्प प्रशासनासमोर झुकलो नाही, तर देश उद्ध्वस्त होईल. सरकार पडेलच, पण देशही टिकणार नाही.
संसद, न्यायपालिका आणि राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी देखील खामेनेईंना चर्चा करण्यासाठी तयार केले. देशाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सध्या युद्ध झेलू शकत नाही. जर अमेरिका किंवा इस्रायलने लष्करी कारवाई केली, तर नतांझ आणि फोर्डो सारख्या अणुठिकाण्यांवर हल्ले होतील, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले होते.
खामेनेई चर्चा करण्यास तयार झाले असले तरी त्यांनी काही ठोस अटी घातल्या आहेत. इराण काही प्रमाणात युरेनियम संवर्धन कमी करण्यास आणि अधिक कठोर आंतरराष्ट्रीय निरीक्षण स्वीकारण्यास तयार आहे. मात्र, त्यांच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर कोणतीही चर्चा होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. इराणच्या मते, हा कार्यक्रम त्यांच्या संरक्षण धोरणाचा भाग आहे.
तसेच, हमास, हिजबुल्ला आणि हुती या इराणसमर्थित गटांबाबतही इराण चर्चेसाठी तयार आहे. परंतु, स्वतःच्या अटींवर चर्चेसाठी तयार अशल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया देत इराणला स्पष्ट इशारा दिला आहे. “जर कोणताही करार झाला नाही, तर इराणला खूप वाईट दिवस पाहावे लागतील. अमेरिका इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.





