Who is Shomika Mahadik : नुकतीच गोकुळ दूध संघाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. गेल्या काही काळापासून गोकुळ दूध संघ या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत राहिला आहे. ही वर्षातली दुसरी सर्वसाधारण सभा होती. या सभेतही मोठा राडा झाला, काही काळ तणावाचे वातावरण होते. काही प्रश्नांची उत्तर मिळत नसल्याने संचालिका शोमिका महाडिक चांगल्याच आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळालं. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सभासदांच्या वाढीस संख्येबाबत शोमिका महाडिक यांनी तीव्र शब्दांत विरोध दर्शविला. या सभेत व्यासपीठावर त्यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्या खुर्चीवर बसणे पसंत केलं नाही. त्यांनी थेट सभासदांसाठी ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसल्या. यामुळे कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता थेट सत्ताधाऱ्यांना भिडणाऱ्या शोमिका महाडिक कोण आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे गोकुळची निवडणूक आणि गोकुळचा कारभार यांच्याकडे नेहमीच लक्ष असते. गोकुळमध्ये गेली २५ ते ३० वर्ष महाडिक यांची सत्ता होती. मात्र, २०२१ मध्ये या सत्तेला सुरुंग लावत आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गोकुळवर एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत शौमिका महाडिक या महाडिक गटातील एकमेव व्यक्ती निवडून आल्या. कोण आहेत शोमिका महाडिक? शौमिका महाडिक या मूळच्या राजश्री शाहू महाराजांचे जनक घराणे म्हणजे घाटगे कुटुंबातील आहेत. भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर आहेत. शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. २०२१ ला झालेल्या जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीत शौमिका महाडिक यांनी पाटील-मुश्रीफ गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांना ४३ मतांनी मागे टाकत संचालकपदी निवडणूक आल्या. हेही वाचा : Mood Swings During Pregnancy: गर्भवतींचे मूड स्विंग्ज्: जाणून घ्या कारणं आणि उपाय