अमेरिकेतल्या चक्रिवादळाचा टेक्सास, मिसिसीपीला फटका
Updated On:

ह्युस्टन – अमेरिकेतील टेक्सास आणि मिसिसीपी या प्रांतांना चक्रिवादळाचा फटका बसला असून या वादळात २ जण ठार झाले आहेत. या वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून वाहनेही उलटली गेली आहेत. ह्युस्टनमधील लिव्हरपूलमध्ये एक ठार आणि ४ जण जखमी झाले आहेत.
तर मिसिसीपीमध्येही एक जण ठार झाला असून २ जण जखमी झाले आहेत. ह्युस्टनमध्ये वादळामुळे मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे. या प्रांतातील दोन विमानतळांवरील विमानसेवा वादळामुळे विस्कळीत झाली.
तर मिसिसीपीमध्ये ७१ हजार घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. बुडे आणि ब्रॅन्डन शहरांमध्ये काही इमारतींची छप्पर उडून गेली. या वादळांचा परिणाम दोन दिवस राहण्याची शक्यता आहे.





