Will Jacks Injury : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इंग्लंडची डोकेदुखी वाढली; विल जॅक्सच्या गंभीर दुखापतीने बिघडलं कर्णधारपदाचं संपूर्ण गणित!
Will Jacks Injury : ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स दुखापतीमुळे दौऱ्याच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

Will Jacks ruled out of the Australia T20I Tour : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पहिल्या टी-२० सामन्यातील रोमांचक पराभवानंतर आता संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स गंभीर दुखापतीमुळे उर्वरित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर पडला आहे. त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाल्याने त्याला दौरा अर्धवट सोडून तातडीने मायदेशी परतावे लागणार असून, संघाची चिंता वाढली आहे.
मेलबर्नमधील पहिल्या सामन्यात झाली गंभीर दुखापत –
२८ वर्षीय विल जॅक्सला शनिवारी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान ही दुखापत झाली. डावाच्या १९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर बेन ड्वारशुइसचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात चेंडू थेट त्याच्या हातावर जोरात आदळला. उजव्या हातातून रक्त येऊ लागल्याने त्याला तात्काळ मैदान सोडावे लागले. वैद्यकीय तपासणीत हाताला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला उर्वरित मालिकेतून बाहेर करण्याचा निर्णय घेतला गेला.
टॉम बँटनकडे सोपवली शेवटच्या सामन्यात संघाची धुरा –
Wishing you a speedy recovery, Jacksy 🙌
Will Jacks has been ruled out of the remainder of the England Men’s white ball tour of Australia after breaking his hand in last night’s T20 against Australia.
An update on plans to replace Jacks in the squad will be issued in due course.
— England Cricket (@englandcricket) November 22, 2026
नियमित कर्णधार हॅरी ब्रूक दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तयारीसाठी लवकर ऑस्ट्रेलिया सोडणार असल्याने, २ डिसेंबर रोजी कॅनबेरा येथे होणाऱ्या पाचव्या टी-२० सामन्यात जॅक्स कर्णधारपद भूषवणार होता. मात्र, दुखापतीमुळे आता त्याच्या जागी टॉम बँटन संघाचे नेतृत्व करेल. जॅक्सच्या अनुपस्थितीमुळे संघाला एका प्रमुख अष्टपैलूची उणीव भासेलच, शिवाय १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीही संघाची डोकेदुखी वाढली आहे. विल जॅक्सच्या जाण्याने इंग्लंडच्या संघातील समतोल आणि कर्णधारपदाच्या नियोजनात मोठा बदल करावा लागला आहे.
ऑस्ट्रेलियाचा टी-२० संघ:
हॅरी ब्रूक (कर्णधार), टॉम बँटन, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स, हेन्री क्रोकोम्बे, सॅम करन, लियाम डॉसन, ल्यूक वूड, एन्युरिन डोनाल्ड, एडी जॅक आणि थॉमस रेव यांचा समावेश आहे.





