Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; बड्या महिला नेत्याची पक्षातून केली हकालपट्टी
Maharashtra Politics : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष रेखा कोंडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष रेखा कोंडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)
पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आल्याचे ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाल्याचे कोंडे यांनी सांगितले आहे. मात्र, पक्षाकडून आपल्याला कोणतेही अधिकृत पत्र देण्यात आले नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Maharashtra Politics)
साहित्य परिषदेच्या आवारातील मारहाण प्रकरण चर्चेत
२० नोव्हेंबर रोजी पुण्यातील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिसरात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर रेखा कोंडे यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराध्यक्षा आरती मारणे-पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप कोंडे यांनी केला होता. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. (Maharashtra Politics)
मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून वाद
रेखा कोंडे या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर सोशल मीडियातून सातत्याने व्यक्त होत होत्या. त्यांच्या भूमिकेवरून आरती मारणे-पवार यांच्याशी मतभेद निर्माण झाल्याचे सांगितले जाते. या वादानंतर मारहाणीची घटना घडली आणि दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. (Maharashtra Politics)
‘सामना’तील वृत्तातून हकालपट्टी समजल्याचा कोंडे यांचा दावा
हकालपट्टीबाबत प्रतिक्रिया देताना रेखा कोंडे यांनी सांगितले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना कोणतेही अधिकृत पत्र देण्यात आले नाही किंवा थेट माहितीही देण्यात आली नाही. पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे आपली हकालपट्टी करण्यात आल्याचे प्रसिद्ध झाल्यानंतरच आपल्याला ही माहिती समजल्याचा त्यांचा दावा आहे. (Maharashtra Politics)
यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. मराठवाड्यात ठाकरे गटाचा आमदार पाडणाऱ्या मनोज जरांगे यांना पक्ष निष्ठावंत मानतो का, असा सवाल त्यांनी केला. तसेच पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करताना त्यांनी सुषमा अंधारे यांचाही उल्लेख केला आणि त्यांचा फोटो दाखवला. रेखा कोंडे यांच्या हकालपट्टीच्या वृत्तानंतर पुण्यातील ठाकरे गटाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : मोठी बातमी..! भाजपच्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; महाराष्ट्रात खळबळ
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचा शिंदेसेनेला धक्का; अनेक शिवसैनिकांचा पक्षात प्रवेश




