Maharashtra Politics : मोठी बातमी..! भाजपच्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; महाराष्ट्रात खळबळ
Maharashtra Politics : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Politics : इंदापूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपला धक्का देत माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मयूरसिंह पाटील यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. विशेष म्हणजे, पक्षात प्रवेश करताच त्यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
मयूरसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे चुलत भाऊ आहेत. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच दुधगंगा तालुका दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. (Maharashtra Politics)
तीन पिढ्यांचा काँग्रेसशी संबंध
काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्यामागे तीन पिढ्यांचा पक्षाशी असलेला संबंध आणि वैचारिक जडणघडण ही कारणे असल्याचे मयूरसिंह पाटील यांनी सांगितले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि त्यांचे चुलते दिवंगत शंकरराव पाटील यांच्या राजकीय वारशाशी त्यांचे कुटुंब जोडलेले आहे. (Maharashtra Politics)
शंकरराव पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार, तर बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. (Maharashtra Politics)
२०२४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश; आता काँग्रेसमध्ये परत
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मयूरसिंह पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ मयूरसिंह पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे. (Maharashtra Politics)
प्रवेशानंतर लगेच तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने मयूरसिंह पाटील यांच्यावर इंदापूर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. स्थानिक पातळीवरील त्यांचा अनुभव आणि कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क लक्षात घेऊन ही जबाबदारी देण्यात आल्याचे दिसते. (Maharashtra Politics)
आता इंदापूरमध्ये काँग्रेसची संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि आगामी राजकीय आव्हानांसाठी पक्षाची बांधणी करणे, अशी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. त्यांच्या घरवापसीमुळे इंदापूरच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचा शिंदेसेनेला धक्का; अनेक शिवसैनिकांचा पक्षात प्रवेश




