Palghar Accident : पालघरमध्ये भीषण अपघात; दहावी-बारावीच्या तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; ट्रकचालक फरार
Palghar Accident : एका भरधाव मोटारसायकलने ट्रकला मागून दिलेल्या जोरदार धडकेत १५ ते १८ वयोगटातील तीन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Palghar Accident : पालघर जिल्ह्यातील बोईसर-नवापूर रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलची ट्रकला धडक बसल्याने १५ ते १८ वयोगटातील तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. (Palghar Accident)
मृतांची ओळख मोहित राकेश वर्मा, रवी विजय गुप्ता आणि नयना महातो अशी पटली असून, ते सर्व बोईसरमधील गणेश नगर भागातील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, मोहित आणि रवी इयत्ता १२वीचे विद्यार्थी होते, तर नयना इयत्ता १० वीत होती. (Palghar Accident)
हे तिघे नांदगाव-आळेवाडी समुद्रकिनाऱ्याकडे जात असताना पाम टेंभीजवळ मोटारसायकलने मागून एका ट्रकला धडक दिली. धडकेनंतर ट्रकचालकाने आपले वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून अपघाताच्या नेमक्या परिस्थितीची चौकशी करत आहेत. (Palghar Accident)
बोपदेव घाटात भरधाव आयशर टेम्पो विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला
पुण्यातील बोपदेव घाट परिसरात भरधाव आयशर टेम्पोने भीषण अपघात केला. एका वाहनाला धडक दिल्यानंतर टेम्पो थेट बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Palghar Accident)
Road Accident : सूस-चांदे मार्गावर रसायन वाहतूक करणारा टँकर उलटला; डीपीचे नुकसान, जीवितहानी नाही





