Suvendu Adhikari: निवडणूक आयोग इन ‘ऍक्शन मोड’! सुवेंदू अधिकारी यांच्या सभेत सुरक्षेकडे दुर्लक्ष ; चार पोलीस अधिकारी निलंबित
Suvendu Adhikari: पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या वातावरणात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे.

Suvendu Adhikari: पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या वातावरणात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. २ एप्रिल रोजी भवानीपूर येथे सुवेंदू अधिकारी यांच्या नामनिर्देशन सभेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेत झालेल्या ढिलाईसाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने निलंबित केले आहे.
या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या या कारवाईवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.
या पोलिसांवर कारवाई Suvendu Adhikari:
ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे, त्यामध्ये सिद्धार्थ दत्ता (डीसी-२, दक्षिण विभाग, कोलकाता पोलीस), प्रियंकर चक्रवर्ती (ऑफिसर-इन-चार्ज, अलिपूर), चंडी चरण बॅनर्जी (अतिरिक्त ओसी, अलिपूर) आणि सौरभ चॅटर्जी (सार्जंट, अलिपूर) यांचा समावेश आहे. या सर्वांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
संपूर्ण घटना काय आहे?
पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्याजवळ १ एप्रिल रोजी निर्माण झालेल्या तणावाला निवडणूक आयोगाने दिलेले हे एक मोठे प्रत्युत्तर आहे. त्यांचा ताफा दक्षिण कोलकात्यातील अलीपूर सर्वे हाऊसकडे जात होता, ज्याठिकाणी अधिकारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, तेव्हा सुरक्षेत त्रुटी निर्माण झाली.
सुवेंदू अधिकारी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव दुष्यंत नारियाला यांना पत्र लिहून चार पोलिसांच्या निलंबनाची आणि त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्याची विनंती केली आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी हे बंगालमधील एक संवेदनशील मतदारसंघ असलेल्या भवानीपूरमधून निवडणूक लढवत आहेत.
त्यांनी २ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते. सुवेंदू अधिकारी हे भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन मतदारसंघांतून भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार Suvendu Adhikari:
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होईल. निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर केला जाईल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ राजकीय नेते बंगालचा दौरा करत आहेत. वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकही पाहायला मिळत आहे.






