Supriya Sule : ‘चिमुकलीला न्याय मिळाला’; नसरापूर प्रकरणाच्या निकालावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी तपास अधिकाऱ्यांसह, यंत्रणांचे मानले आभार

Supriya Sule : नसरापूर येथे अवघ्या 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने गुरुवारी (दि. २५) दोषी ठरविले. त्यानंतर आज (दि. २९) या घटनेचा निकाल लागला आहे. (Supriya Sule )
आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालाचे खासदार सुप्रिया सुळेंकडून स्वागत करण्यात आले आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत लिहिले की, “पुण्यातील विशेष न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्याप्रकरणी नराधमास फाशीची शिक्षा सुनावली. अखेर पीडित चिमुकलीला न्याय मिळाला असून आम्ही सर्वजण या निकालाचे स्वागत करतो. ही घटना अतिशय दुर्दैवी होती. (Supriya Sule )
पुण्यातील विशेष न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्याप्रकरणी नराधमास फाशीची शिक्षा सुनावली. अखेर पीडित चिमुकलीला न्याय मिळाला असून आम्ही सर्वजण या निकालाचे स्वागत करतो. (Supriya Sule )
ही घटना अतिशय दुर्दैवी होती. आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल असेच अपेक्षित होते. अशा घटनांची सुनावणी…
— Supriya Sule (@supriya_sule) June 29, 2026
आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल असेच अपेक्षित होते. अशा घटनांची सुनावणी फास्ट्रट्रॅक कोर्टात होऊन आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आम्ही सातत्याने मांडत आलो आहोत. आज पिडिता आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पिडितेला भावपूर्ण श्रद्धांजली.” (Supriya Sule )
तसेच सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा तपास अधिकाऱ्यांनी उत्तमरित्या तपास करुन पुरावे कोर्टापुढे सादर केले. याबद्दल तपास यंत्रणांचेही मनापासून आभार व्यक्त केले.
हेही वाचा:





