Sri Lanka U-19 Cricketers : कोलंबोच्या हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार; अंडर-१९ क्रिकेटपटूंच्या कृत्यामुळे क्रीडा विश्वात खळबळ!
Sri Lanka U-19 Cricketers : पोलिसांनी अटक केल्यानंतर दोन्ही खेळाडूंना अलुथकाडे मजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले होते.

Sri Lanka U-19 Players Arrested : आयपीएल २०२६(IPL2026) च्या हंगामादरम्यान श्रीलंका क्रिकेटमधून एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी बातमी समोर आली आहे. श्रीलंका अंडर-१९ क्रिकेट संघाच्या दोन युवा खेळाडूंना हॉटेलमध्ये महिलांचा आंघोळीचा व्हिडीओ बनवण्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या दोन्ही खेळाडूंची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.
काय आहे संपूर्ण घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंका अंडर-१९ क्रिकेट संघ कोलंबोमधील नराहेनपीटा (Narahenpita) परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होता. याच हॉटेलमध्ये काही महिलाही थांबल्या होत्या. या महिलांनी युवा क्रिकेटपटूंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. खेळाडूंनी मोबाईल फोनच्या माध्यमातून त्यांच्या बाथरूममधील व्हिडीओ शूट केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. तक्रार मिळताच नराहेनपीटा पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही खेळाडूंना ताब्यात घेतले. हे व्हिडिओ इतरत्र कुठे शेअर केले गेले आहेत का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. (Sri Lanka U-19 Cricketers)
न्यायालयातून जामीन मंजूर –
Two Sri Lanka U-19 cricketers were arrested in Colombo’s Narahenpita area on suspicion of filming women in hotel bathrooms. According to reports, they were later released on personal bail of LKR 500,000 (approx. $1,564). The complaint was filed by women staying at the hotel who… pic.twitter.com/32vbAyVRBj
— The Statesman (@TheStatesmanLtd) May 1, 2026
पोलिसांनी अटक केल्यानंतर दोन्ही खेळाडूंना अलुथकाडे मजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ५ लाख श्रीलंकाई रुपयांच्या (अंदाजे १,५६४ अमेरिकी डॉलर) वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ मे रोजी होणार आहे. दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) अद्याप या खेळाडूंवर कोणतीही अधिकृत कारवाई केलेली नाही. (Sri Lanka U-19 Cricketers)
श्रीलंका क्रिकेटमध्ये प्रशासकीय बदल –
सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्ड मोठ्या प्रशासकीय बदलांमधून जात आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना हटवून एक नवी ट्रान्सफॉर्मेशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीचे अध्यक्षपद माजी खासदार एरन विक्रमरत्ने यांच्याकडे सोपवण्यात आले असून, त्यात कुमार संगकारा, रोशन महानामा आणि सिदाथ वेट्टिमुनी यांचाही समावेश आहे. या गंभीर प्रकरणानंतर ही ट्रान्सफॉर्मेशन कमिटी दोन्ही खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. (Sri Lanka U-19 Cricketers)





