Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा; दानवेंच्या विधानाने नवा सस्पेन्स, बैठकीला खासदाराची दांडी
Ambadas Danve : लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या दोन वर्षांपासून अशा चर्चा सातत्याने होत असून आता या चर्चांवर अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

Ambadas Danve : ठाकरे गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या दोन वर्षांपासून अशा चर्चा सातत्याने होत असून आता या चर्चांवर अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
लोकसभेची निवडणूक होऊन दोन वर्ष झाले आहेत. या दोन वर्षात अशी चर्चा आहे. शिवाय महिन्याला, दर दोन महिन्याला अशी चर्चा होतच असते. काही खासदार एकनाथ शिंदेयांच्या संपर्कात असतील, तर काही तर उघड उघड बोलत आहेत. आम्हालाही सर्व माहित आहे. मात्र दर महिना दोन महिन्याला संपर्कात असल्याची चर्चा होते आता हे अधिकृत कबूल करायला हवं, असं मोठं वक्तव्य मराठवाडा दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी केले आहे.
ओमराजेंची दांडी, चर्चांना उधाण (Ambadas Danve)
ठाकरे गटातील सात खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा : Rain Updates : चिंता वाढली! मान्सूनच्या वाटेत नवे संकट; हवामान खात्याचा 21 जिल्ह्यांना अलर्ट
ओमराजे निंबाळकर यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता दानवे यांनी “काही महत्त्वाचे काम असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसतील. बैठकीचे आयोजन त्यांच्या कार्यालयातच करण्यात आले होते,” असे सांगत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मोठी राजकीय घडामोड घडणार? (Ambadas Danve)
मात्र, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना आधीच वेग आला असताना आणि ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत असताना ओमराजे निंबाळकर यांची बैठकीला गैरहजेरी अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. आगामी काळात ठाकरे गटात मोठी राजकीय घडामोड होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे घेणार खासदारांची बैठक
या सगळ्या घडामोडी घडत असताना येत्या काही दिवसांत माजी मुख्यमंत्री आणि उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्या पक्षातील खासदारांसमवेत महत्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत ते बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा : PMRDA: पीएमआरडीएच्या १५ टीपी योजना धुळीत! शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे मिळेना मुहूर्त






