Sachin Tendulkar Birthday : ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचा ५३ वा वाढदिवस! घरगुती सेलिब्रेशनमध्ये ‘द ट्रबल मेकर’च्या एन्ट्रीने वेधलं लक्ष
Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकरच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आज क्रिकेट विश्वात उत्साहाचे वातावरण आहे.

Sachin Tendulkar 53rd Birthday Celebration : ‘क्रिकेटचा देव’ मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आज वयाची ५३ वर्षे पूर्ण केली आहेत. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, मास्टर ब्लास्टरने आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन अतिशय साधेपणाने आणि कौटुंबिक वातावरणात साजरे केले आहे. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेल्या एका फोटोने सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Sachin Tendulkar Birthday)
सचिन तेंडुलकरच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आज क्रिकेट विश्वात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, झगमगाटापासून दूर सचिनने हा खास दिवस आपली आई, पत्नी आणि एका खास सदस्यासोबत घालवला. सचिनने सोशल मीडियावर आपल्या घराचा एक कोपरा चाहत्यांशी शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या आयुष्यातील साधेपणा आणि भक्ती प्रकर्षाने दिसून येत आहे.
Perfect start to my day with Aai, Anjali and the trouble maker! What more could a man ask for? ❤️ pic.twitter.com/MdniDnWdnl
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 24, 2026
कोण आहे हा ‘द ट्रबल मेकर’? (Sachin Tendulkar Birthday)
Sachin Tendulkar Cuts Cake With Fans on 53rd Birthday#SachinTendulkar #HappyBirthdaySachin #GodOfCricket #MumbaiIndians pic.twitter.com/qNIH8ISXY5
— MK Sharma ✍️ (@EmediaManoj) April 24, 2026
सचिनने शेअर केलेल्या फोटोत तो पत्नी अंजली आणि आई रजनी तेंडुलकर यांच्यासोबत सोफ्यावर बसलेला दिसत आहे. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सचिनच्या मांडीवर बसलेल्या एका गोड सदस्याने. हा सदस्य म्हणजे त्याचा गोल्डन रिट्रीव्हर जातीचा पाळीव कुत्रा. सचिनने त्याला गमतीने ‘The Trouble Maker’ असे संबोधले आहे. या फोटोवरून सचिनचे प्राणीप्रेम आणि घरातील त्याचा मस्तीखोर स्वभाव समोर आला आहे.
भक्तिमय वातावरण आणि साधेपणा – (Sachin Tendulkar Birthday)
A day full of love, smiles & legacy ❤️🎂
Sachin Tendulkar celebrating his special day with family and fans — just the way it should be 👑[ Sachin Tendulkar, God of cricket, Fans, Family, Birthday]. pic.twitter.com/QRRuLb7I0f
— SportsTiger (@The_SportsTiger) April 24, 2026
या फोटोच्या पार्श्वभूमीवर सचिनच्या घरातील देव्हारा आणि भिंतीवर लावलेले गणपती, विठ्ठल-रखुमाई आणि इतर देवादिकांचे फोटो दिसत आहेत. हे दृश्य सचिनच्या घरातील संस्कार आणि भक्तिमय वातावरणाची साक्ष देते. मुंबई इंडियन्ससह जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंनी सचिनच्या या साधेपणाचे कौतुक करत त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ५३ व्या वर्षीही सचिनचा उत्साह आणि कुटुंबाप्रती असलेले प्रेम त्याच्या चाहत्यांना प्रेरणा देत आहे. (Sachin Tendulkar Birthday)





