Jailer 2 Trailer : रजनीकांत यांचा जबरदस्त स्वॅग! अॅक्शन पॅक्ड ट्रेलरने वेधलं लक्ष; विद्या बालनची दिसली खास झलक
Jailer 2 Trailer : ‘जेलर २’मध्ये रजनीकांत पुन्हा एकदा मुथुवेल पांडियन या लोकप्रिय भूमिकेत दिसणार आहेत.

Jailer 2 Trailer : सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवल्यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता ‘जेलर २’कडे लागली आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा रजनीकांत यांचा तोच जबरदस्त दरारा आणि खास स्टाइल पाहायला मिळत आहे.
‘जेलर’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ‘जेलर २’ (Jailer 2 )कडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रजनीकांत यांची दमदार एन्ट्री, अॅक्शन आणि त्यांचा खास स्वॅग पाहायला मिळतो. मात्र, चित्रपटाच्या कथानकाबाबत फारसे संकेत ट्रेलरमधून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर ट्रेलरबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेक चाहत्यांनी ट्रेलर समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. (Jailer 2 Trailer)
‘जेलर २’मध्ये रजनीकांत पुन्हा एकदा मुथुवेल पांडियन या लोकप्रिय भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले असून, संगीताची जबाबदारी अनिरुद्ध रविचंदर यांनी सांभाळली आहे. या भागात काही नव्या कलाकारांचीही एन्ट्री झाली आहे. मात्र, बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा लूक गुप्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटातील त्याची भूमिका नेमकी काय असणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. (Jailer 2 Trailer)
चित्रपटात विद्या बालन, मिथुन चक्रवर्ती, एस. जे. सूर्या, जॅकी श्रॉफ, शिवराजकुमार आणि मोहनलाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे दमदार स्टारकास्ट हे ‘जेलर २’चे आणखी एक आकर्षण ठरणार आहे. ‘जेलर २’ हा चित्रपट १५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Jailer 2 Trailer)
दरम्यान, अंदाजे २०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘जेलर’ने जगभरात ६०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या तमिळ चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला होता. त्यामुळे आता ‘जेलर २’मध्ये रजनीकांत यांचा तोच जलवा पुन्हा पाहायला मिळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. (Jailer 2 Trailer)
Buldhana Crime News : बुलढाण्यात दोन गटात तुफान राडा; हाणामारीत शिंदेंच्या नगरसेवकाचा मृत्यू





