Saba Azad Hospitalised: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद रुग्णालयात दाखल; चाहत्यांना केलं ‘हे’ आवाहन
Saba Azad Hospitalised:

Hrithik Roshan Girlfriend Saba Azad Hospitalised : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री,गायिका सबा आझाद रुग्णालयात दाखल झाली आहे.
तिला सायक्लोस्पोरा कायेटानेन्सिस(Cyclospora cayetanensis)चा संसर्ग झाल्याने ती रुग्णालयात उपचार घेत आहे. सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करत तिने चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.
सबा आझादने रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला एक फोटो शेअर करत लिहिले की, “माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट १४ दिवस. सायक्लोस्पोरा कायटेनेन्सिस (Cyclospora cayetanensis), तू खूप वाईट आजार आहेस.
माझ्यासारख्या, जी फक्त घरचे जेवण खाते आणि नेहमी स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवते, तिला हा विषाणू कुठून आला याचे मला आश्चर्य वाटते आणि तेही वर्षाच्या सर्वात व्यस्त काळात….माझे वजन आधीच खूप कमी आहे त्यात दोन आठवड्यांत माझे ४ किलो वजन कमी झाले आहे. आता चालताही येत नाही.”
पुढे ती म्हणाली की, मी दिवसातून दोनदा पुल-अप्स, जड वजन उचलण्याचा व्यायाम करत होते आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या शरीराचा आकार निम्मा झाला होता.
View this post on Instagram
वजन उचलणे तर दूरच, माझ्यात एक साधी टूथपिक उचलण्याचीही ताकद उरली नव्हती. म्हणून, कृपया, तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी, भाज्या साफ धुवा. कारण कधीकधी त्यामुळे तुम्ही आजारी पडता. बेकिंग सोडा + व्हेजी वॉश.”
‘हृतिक माझ्या सर्वात चिडचिड्या मूडमध्ये माझ्यासोबत’
सबाने पुढे लिहिले की तिचा हा फोटो हृतिक रोशनने काढला आहे. सबाने लिहिले, “हृतिक माझ्या सर्वात चिडचिड्या मूडमध्ये माझ्यासोबत होता. तो नेहमीच कठीण परिस्थितीतही मला हसवतो खूश करतो.
मी या फोटोमध्ये दिसते तितकी अशक्त किंवा लहान झालेली नाही. खरं तर हा बेड खूप मोठा आहे आणि फोटोचा अँगल वाइड आहे. त्यामुळे मी अशी दिसतेय”, असंही तिने सांगितले. Hrithik Roshan Girlfriend Saba Azad Hospitalised
हेही वाचा:





