Pune Parvati Crime: “आयांनो सावध रहा, काळ बदललाय…”; पर्वती पायथा परिसरात घडलेल्या घटनेनंतर चित्रा वाघ यांचे आवाहन
Pune Parvati Crime: सख्ख्या नातीवर 50 वर्षीय आजोबाकडून अत्याचाराचा प्रयत्न

Pune Parvati Crime News : पुण्यात नसरापूरनंतर आणखी एका 9 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पर्वती परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या संतापजनक घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याला 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 50 वर्षांच्या व्यक्तीने चिमुकलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. हा प्रकार नागरिकांनी पाहिल्याने अनर्थ टळला. नागरिकांमुळे पीडितेची नरधमाच्या तावडीतून सूटका झाली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. Pune Parvati Crime
घरातही लेकरं सुरक्षित नाहीत का? (Pune Parvati Crime)
याप्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. “पुण्यात सख्ख्या नातीवर आजोबांनी केलेल्या अत्याचाराने मन सुन्न झालं. घरातही लेकरं सुरक्षित नाहीत का? हा प्रश्न अस्वस्थ करतोय. नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या असल्या लिंग पिसाटांपासून आपल्या लेकरांना वाचवायचं कसं? हा प्रश्न आई-बापांना पडलाय. मुख्यमंत्र्यानी पॅरोल न देण्याबाबत दिलेल्या सूचनांनी थोडा दिलासा मिळतोय. पण, आयांनो सावध रहा. काळ बदललाय. आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा,” अशी प्रतिक्रिया भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली आहे. Pune Parvati Crime
पुण्यात सख्ख्या नातीवर आजोबांनी केलेल्या अत्याचाराने मन सुन्न झालंय…
घरातही लेकरं सुरक्षित नाहीत का, हा प्रश्न अस्वस्थ करतोय.
या हरामखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या असल्या लिंग पिसाटांपासून आपल्या लेकरांना वाचवायचं कसं हा प्रश्न आई बापांना पडलाय…आज मुख्यमंत्री… pic.twitter.com/YGunDVZN0q
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 5, 2026
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल (Pune Parvati Crime)
या प्रकारणी नराधम आजोबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाच्या पोलीस तपासात आरोपीने दारूच्या नशेत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रात्री उशिरा या लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ज्येष्ठ व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. तर पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आलं आहे. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांना नागरिकांना शांत करण्यात यश आले.
हेही वाचा:
Project Freedom: अमेरिकेकडून जगाला पुन्हा धक्का ; होर्मुझमधील जहाजांविषयी घेतला ‘हा’ मोठा निर्णय





