Pakistani Umpire Controversy : आधी फायनल न खेळताच ट्रॉफी पळवली, आता पाकिस्तानी पंचांच्या धक्कादायक सेलिब्रेशनचा VIDEO होतोय व्हायरल!
Pakistani Umpire Celebration Controversy : ढाका येथे २०२६ च्या ब्लाइंड क्रिकेट आशिया कपचा फायनस सामन्यानंतर पेटलेलला वाद सुरु असतानाचा, एका पाकिस्तानी पंचाचा पाकिस्तानी खेळाडूंसोबत जल्लोष करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Pakistani Umpire Controversy Jet Crash Celebration Video Viral : ढाका येथे पार पडलेल्या पुरुष अंध क्रिकेट आशिया चषक २०२६ च्या वादग्रस्त फायनल सामन्यानंतर आता एक नवा वाद उफाळून आला आहे. पावसामुळे सामना रद्द होऊनही पाकिस्तानला विजेते घोषित केल्याचा मुद्दा ताजा असतानाच, एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पर्धेत पंचगिरी करणारा एक पाकिस्तानी पंच चक्क पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत ‘जेट क्रॅश’सारखा जल्लोष करताना दिसत आहे. या प्रकारामुळे ‘क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया’ने (CABI) पंचांच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पंचांच्या वर्तनावर सीएबीआईची तीव्र नाराजी –
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय गोटात संतापाची लाट पसरली आहे. सीएबीआईने अधिकृत निवेदन जारी करत पाकिस्तानी पंचांच्या या अव्यावसायिक वर्तनावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मैदानावर पूर्णपणे निष्पक्ष राहणे हा पंचांचा पहिला धर्म असतो, कोणत्याही एका संघाचा समर्थक बनून जल्लोष करणे नव्हे, असे सीएबीआईने ठणकावून सांगितले. संपूर्ण स्पर्धेत पंचगिरी करणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारे एका संघाची बाजू घेतल्याचे दिसणे हे पंचगिरीच्या नियमांचे थेट उल्लंघन असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाणेफेकीशिवाय रद्द झालेल्या फायनलमुळे पेटला वाद –
This Pakistani umpire officiated throughout the Asia Cup Cricket for the Blind 2026, yet is seen celebrating with the Pakistan team.
As per the principles of officiating, an umpire must remain neutral and should never be seen aligning with any team. https://t.co/tFFGgALZpd
— Cricket Association for the Blind in India (CABI) (@blind_cricket) November 21, 2026
या संपूर्ण वादाचे मूळ ढाका येथील अंतिम सामन्यात आहे, जो सततच्या पावसामुळे नाणेफेक न होताच रद्द झाला होता. अंतिम सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नसल्याने स्पर्धेच्या नियमांनुसार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करणे अपेक्षित होते. मात्र, आयोजकांनी चांगल्या नेट रनरेटचे कारण पुढे करत एकतर्फी निर्णय घेऊन पाकिस्तानला एकमेव विजेते घोषित केले, ज्यामुळे मोठा वाद पेटला.
पाकिस्तानविरुद्ध भविष्यात न खेळण्याचा भारताचा इशारा –
आयोजकांच्या या मनमानी निर्णयाचा निषेध करत भारतीय अंध क्रिकेट संघाने बक्षीस वितरण समारंभावर बहिष्कार टाकला होता. त्यातच आता पाकिस्तानी पंचांच्या या कृत्यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट तणाव शिगेला पोहोचला आहे. या संपूर्ण प्रकरणावर योग्य तोडगा निघेपर्यंत भारतीय संघ भविष्यात पाकिस्तानविरुद्ध एकही सामना खेळणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा सीएबीआईने पुन्हा एकदा दिला आहे.





