MH Cabinet Meeting Decision: आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 4 महत्वाचे निर्णय; जाणून घ्या सविस्तर
MH Cabinet Meeting Decision: शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ, डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टला जमीन आणि नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठी मुद्रांक शुल्क माफी असे निर्णयही घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.

MH Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णयांना मंजुरी देण्यात आली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ज्येष्ठ समाजवादी नेते तथा कोकण रेल्वेचे शिल्पकार स्व. मधू दंडवते यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ, डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टला जमीन आणि नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठी मुद्रांक शुल्क माफी असे निर्णयही घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामकरणास मंजुरी – (MH Cabinet Meeting Decision)
कोकण रेल्वेच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ नेते स्व. मधू दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने मंत्रिमंडळासमोर मांडला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून स्थानकाचे नाव ‘लोकनेते मधू दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यात येणार आहे. याबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कोकणातील जनतेची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती.
पेट्रोल-डिझेल टंचाईवरही चर्चा – (MH Cabinet Meeting Decision)

MH Cabinet Meeting Decision: आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 4 महत्वाचे निर्णय; जाणून घ्या सविस्तर
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा अल्प प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत यावरही चर्चा करण्यात आली. ऑईल कंपन्यांशी सातत्याने संपर्क सुरू असून पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिली.
शासकीय बदल्यांना मुदतवाढ –
शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. यासाठी ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५’ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टला जमीन –
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मंदिर ट्रस्टचा या जमिनीवरील वापर नियमित करण्यासही मान्यता देण्यात आली.
नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठी मुद्रांक शुल्क माफी –
नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी हिंगणा तालुक्यातील मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) येथील खासगी जमीन थेट खरेदी करण्यात येणार आहे. या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.





