Navneet Rana : वडेट्टीवारांच्या टीकेला नवनीत राणांचे एकाच वाक्यात खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाल्या “चिल्लर माणसांवर….”
Navneet Rana : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला माजी खासदार नवनीत राणांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

Navneet Rana : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार करुन त्यांचे व्हिडिओ व्हायरल प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगचेल तापले आहे. या प्रकरणावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता या टीकेला नवनीत राणा यांनी जशात तशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?
नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी विषवल्ली आहे, अशी बोचरी टीका वडेट्टीवार यांनी केली होती. नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मांमध्ये भांडण लावून समतेची पोळी कशी चाखता येईल हे पाहणे. महिलांवरील शोषण अत्याचारांमध्ये जात, धर्म, पंथ येतो कुठे? असा सवाल विचारत जो कुणी असेल तो नालायकच असतो त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले होते.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी लोकांनी पाडलं लोकांनी जिरवली तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाहीत. ज्यांना हनुमान चालीशीच्या दोन ओळी म्हणता येत नाहीत, ते हिंदू धर्मांच्या गोष्टी करायला लागल्यात, असा बोचरा वार केला होता.
नवनीत राणांचे प्रत्युत्तर
चिल्लर माणसांवर मला काही बोलायची गरज नाही; काँग्रेसने हिरवे विषारी साप पोसून ठेवलेत म्हणून ते वळवळ करताहेत, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
काँग्रेसने त्यांच्या काळात विषारी सापांना जपण्याचे काम केले होते आणि ते बाहेर निघत आहेत. पण विषारी सापांना ठेचण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान करताहेत. त्यांना सोडणार नाहीत, पण हे चिल्लर लोक बोलताहेत त्यांनी आम्हाला सांगू नये आम्ही काय केलं पाहिजे, असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
भाजप काँग्रेसमध्ये राजकीय वादंग
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तरुणी हिंदू असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणाला धार्मिक वळण दिले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असून, स्थानिक राजकीय वर्तुळात भाजप आणि काँग्रेस पक्षात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे.
हेही वाचा : Mamata Banerjee : “महिलांना आरक्षण न मिळणे दुर्दैवी..”; ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधानांवर आरोप






