MS Dhoni Video : “मी फिट दिसतोय ना?”; IPL च्या रणधुमाळीत थेट NSG कॅम्पमध्ये पोहोचला धोनी; कमांडोजसोबतचा VIDEO व्हायरल!
MS Dhoni Video : धोनीचा एक नवा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, यात तो कमांडोजसोबत शूटिंगचा सराव करताना आणि धमाल करताना दिसत आहे.

MS Dhoni NSG Camp Video Viral : आयपीएल २०२६ च्याअंतिम टप्प्यातील सामन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचे कारण क्रिकेट नसून, त्याने राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच ‘एनएसजी’ (NSG) कमांडोजसोबत घालवलेले काही खास क्षण आहेत. धोनीचा एक नवा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, यात तो कमांडोजसोबत शूटिंगचा सराव करताना आणि धमाल करताना दिसत आहे.
“फिट दिसतोय ना?” धोनीच्या एका प्रश्नाने पिकला हशा!
मिळालेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी धोनीने चेन्नईतील एनएसजीच्या प्रादेशिक केंद्राला (रिजनल हब) भेट दिली. तेथे त्याने देशाच्या शूर कमांडोजची भेट घेत कॅम्पमधील विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला. यावेळी धोनीने फायरिंग रेंजवर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांमधून अचूक निशाणा साधत शूटिंगचा सरावही केला. ब्लॅक टी-शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये नेहमीप्रमाणेच धोनी प्रचंड फिट दिसत होता. या भेटीदरम्यान जेव्हा कमांडोजच्या फिटनेस आणि ट्रेनिंगवर चर्चा सुरू होती, तेव्हा धोनीने अचानक स्वतःकडे बोट दाखवत विचारले, “मी फिट दिसतोय ना?” धोनीचा हा मजेशीर प्रश्न ऐकताच तिथे उपस्थित सर्व जवान खळखळून हसले.
MS Dhoni having a conversation with NSG Commandos,
“Am I looking fit?” 😂❤️ pic.twitter.com/WeMwTOjZgh
— DHONI Trends™ (@TrendsDhoni) May 17, 2026
भारतीय सेनेशी अतूट नाते –
6/6 hitting targets 🎯💥
– Posted by an NSG Official @msdhoni #MSDhoni pic.twitter.com/t8MH8XcgMp
— DHONI Trends™ (@TrendsDhoni) May 17, 2026
एमएस धोनीचे भारतीय लष्करावरील प्रेम आणि नाते जगजाहीर आहे. २०११ मध्ये भारतीय लष्कराने त्याला टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये ‘मानद लेफ्टनंट कर्नल’ ही पदवी देऊन गौरविले होते. धोनीने हा मान केवळ एक औपचारिकता म्हणून ठेवला नाही, तर त्याने लष्कराचे खडतर ट्रेनिंग मॉड्यूल पूर्ण केले आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष गार्ड ड्युटीचे कर्तव्यही बजावले आहे.
आयपीएल २०२६ मधील पुनरागमनाची उत्सुकता –
सध्या सर्व क्रिकेट चाहते आयपीएल २०२६ च्या मैदानावर धोनीच्या पुनरागमनाची चातकासारखी वाट पाहत आहेत. दुखापतीमुळे धोनी या संपूर्ण हंगामात आतापर्यंत एकही सामना खेळू शकलेला नाही. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आगामी घरच्या सामन्यापूर्वी धोनीने नेट्समध्ये फलंदाजीचा कसून सराव केला आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक चाहत्यांच्या मते, जर धोनी या सामन्यात मैदानात उतरला, तर हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरण्याची दाट शक्यता आहे.





