Pune News: पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग; ५० ते ६० दुकानं जळून खाक
Pune News: आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही

Pune News: पुण्यातील टिंबर मार्केट परिसरातील जय वल्लभ शाळेजवळ मध्यरात्री २ वाजून ५ मिनिटांनी लाकडी सामान असलेल्या दुकानांना भीषण आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आगीची माहिती मिळताच पुणे महापालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाची जवळपास २७ वाहने घटनास्थळी दाखल करण्यात आली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या आगीत अंदाजे ५० ते ६० पेक्षा अधिक दुकानांना आग लागल्याची माहिती आहे.
सुदैवाने शेजारील रहिवासी वसाहतीतील घरांना आगीपासून सुरक्षित ठेवण्यात जवानांना यश आले. सध्या घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू असून या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. तसेच आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा:
Latif Bhat Encounter: कुलगाममधील चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भट ठार; शरण येण्यास नकार





