Devendra Fadnavis : अखेर ठरलं? CM फडणवीस दिसणार नव्या भूमिकेत; दिल्लीत हालचालींना वेग, ‘ही’ तीन नावही आघाडीवर
Devendra Fadnavis : नेमकं दिल्लीत काय घडतयं आणि खरचं मुख्यमंत्री फडणवीसांवर दिल्लीच्या राजकारणात मोठी जबाबदारी सोपवली जाणार का? हे जाणून घेऊयात...

Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे आगामी काळात त्यांच्यावर दिल्लीतील राजकारणात मोठी जबाबदारी सोपविण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पडद्यामागे वेगवान हालचाली होत असून लवकरच आनंदाची बातमी समोर येणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. नेमकं दिल्लीत काय घडतयं आणि खरचं मुख्यमंत्री फडणवीसांवर दिल्लीच्या राजकारणात मोठी जबाबदारी सोपवली जाणार का? हे जाणून घेऊयात…
स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पार्टीने पक्षात मोठे संघटनात्मक बदल केले. टीम नितीन नवीनची घोषणा करण्यात आली. या टीममध्ये काही तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे, तर काही नाराज नेत्यांचे पुनर्वसन केल्याचे बोलले जात आहे. आता महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाकडून मोठी संघटनात्मक जबाबदारी किंवा थेट केंद्रात मंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
फडणवीसांनी केले स्पष्ट
मागील काही आठवड्यांपासून देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा वाढला असल्याचे बघायला मिळाले. साहजिकच महाराष्ट्रातील विरोधकांकडून त्यांना केंद्रात संधी मिळणार असल्याचा दावा केला गेला. त्यामुळे फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली. या चर्चांवर फडणवीसांनी स्वत: भाष्य करत महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
तीन मुख्यमंत्र्यांची नावं आघाडीवर
मात्र, सध्या घडत असलेल्या घडामोडी पाहता केंद्रीय संसदीय समिती मंडळाच्या पुर्नरनेची घोषणा केली जाणार असून या समितीत देवेंद्र फडणवीसांना स्थान दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच दिल्ली वाऱ्या वाढल्या का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीसांबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचेही नाव ‘संसदीय मंडळा’साठी आघाडीवर आहे. त्यामुळे यापैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांवर केंद्रीय नेतृत्व जबाबदारी सोपवणार याविषयी अनेक तर्क वितर्क बांधले जात आहेत.
राजकीय वजन वाढणार
भाजपच्या घटनेनुसार ‘संसदीय मंडळ’ महत्वाचे मानले जाते. या मंडळाच्या माध्यमातून अनेक मोठे निर्णय घेतले जातात. या मंडळात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह १२ सदस्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे फडणवीसांचा ‘संसदीय मंडळा’त समावेश करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे. या ‘संसदीय मंडळा’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. फडणवीस यांची या समितीत नियुक्ती झाल्यास त्यांचे राजकीय वजन दिल्लीत वाढणार आहे.
Kalas News : वायाळवस्तीपाटी-गोसावीवाडी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास






