Kalas News : वायाळवस्तीपाटी-गोसावीवाडी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास
Kalas News : हा रस्ता कळस - लोणीदेवकर या मार्गाला जाऊन मिळाला असल्याने या रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांन सह नागरिकांनची सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्दळ असते.

कळस : वायाळवस्तीपाटी ते गोसावीवाडी सुमारे एक किलोमीटर अंतरावरील रस्त्याची दुरवस्था झाल्याने येथील नागरिकांनासह शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामासाठी लक्ष देऊन येथील रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी येथील नागरिकांनसह शालेय विद्यार्थ्यांनामधुन होत आहे.
हा रस्ता कळस – लोणीदेवकर या मार्गाला जाऊन मिळाला असल्याने या रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांनासह नागरिकांची सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्दळ असते. या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला काटेरी झाडे झुडपे वाढलेली असुन ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अनेकदा रात्री अपरात्री छोटे मोठे अपघात देखील घडत आहेत. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

