Sushma Andhare : उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव, प्रतिमेला जोडे मार; अंधारेंचं कृष्णा आष्टीकरांना आव्हान
Sushma Andhare : तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी बंडखोरी केलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांचा समाचार घेतला.

Sushma Andhare : काल शिवसेनेचा 60 वा वर्धापनदिन झाला. या निमित्ताने शिवसेनेचे दोन स्वतंत्र मिळावे पार पडले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद सभागृह येथे पार पडला. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे झाला. दोन्ही ठिकाणच्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचे गर्दी पाहायला मिळाली.
होत असलेल्या आरोपांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भरसभेतून मी पदावरुन पायउतार व्हायला तयार असल्याची घोषणा केल्याने अनेकांना धक्का बसला. उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना देखील याचा मोठा धक्का बसला असून त्या माध्यमांशी बोलताना भावूक झाल्याचे बघायला मिळाले. तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी बंडखोरी केलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांचा समाचार घेतला. (Sushma Andhare)
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांनी आपण अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.
हेही वाचा : Khed Water Scarcity: खेड तालुक्यात पाणीबाणी! १७ गावे अन् १११ वाड्यांना टँकरचा आधार; पाहा भीषण वास्तव
सुषमा अंधारे म्हणाल्या, “कृष्णा आष्टीकर खरोखरच उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतील, तर त्यांनी स्वतःच्या वडिलांचे पिंडदान करून दाखवावे आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपली निष्ठा सिद्ध करावी.” तसेच, “बाप तसा बेटा” अशी टीकाही केली. (Sushma Andhare)
दरम्यान, वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नाराजी आणि नेतृत्वावर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, “माझ्या नेतृत्वाबाबत आरोपांमध्ये तथ्य वाटत असेल, तर मी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे,” असे मोठं विधान केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक शिवसैनिक भावूक झाले. सुषमा अंधारे देखील भावूक झाल्या आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, “आम्ही त्यांच्यासोबत लढण्यासाठी तयार आहोत,” असे सांगितले.
बंडखोर खासदारांवर साधला निशाणा (Sushma Andhare)
“एकदा विकले गेलेले लोक पुन्हा पुन्हा विकले जातात. उद्या अमित शहा यांनी मोठी बोली लावली तर हेच खासदार तिकडे जातील. आम्ही ब्रँड तयार करणारे आहोत, फक्त भुंकणारे लोक नाही,” अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी बंडखोर खासदारांवर निशाणा साधला.






