Raj Thackeray : “बेसावध राहू नका, पायाखालची जमीन सरकली ना…”; राज ठाकरेंचा मोठा इशारा, फडणवीसांना कडक शब्दांत सुनावलं
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००८ मधील रेल्वे भरती आंदोलनाची आठवण करून देत महाराष्ट्र सैनिकांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याचे आवाहन केले.

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भाषण करत मोठा इशारा दिला.
रेल्वेत काम करताना बेसावध राहू नका. कुठेही असा बेसावध राहू नका, पायाखालची जमीन सरकली ना तर मग कळेल, असे विधान मनसेच्या रेल्वे आंदोलनाची सुरूवात कशी झाली हे सांगताना राज ठाकरेंनी केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००८ मधील रेल्वे भरती आंदोलनाची आठवण करून देत महाराष्ट्र सैनिकांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याचे आवाहन केले.
रेल्वेतील भरती, स्थानिकांना मिळणाऱ्या नोकऱ्या आणि मराठी तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी त्या संघर्षाची आठवण कायम ठेवण्याचे सांगितले. (Raj Thackeray)
हेही वाचा : Pune : पु. ना. गाडगीळ अँड सन्सच्या ‘रेवा डायमंड्स’चे तिसरे एक्सक्लुझिव्ह शोरूम हडपसरमध्ये सुरू
राज ठाकरे म्हणाले…. (Raj Thackeray)
“आपलं आणि रेल्वेचं नातं वेगळं आहे. २००८ मधील रेल्वे भरती आंदोलनातूनच पक्षाला मोठी ताकद मिळाली. त्यानंतर पक्षाला रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्हही मिळालं. मला रेल्वेतून प्रवास करणं माहीत आहे, तांत्रिक बाबी माहीत नसल्या तरी त्या आंदोलनाचं महत्त्व कधीही विसरू नका.” असे महत्वाचे आवाहन राज ठाकरेंनी पक्षातील कार्यकर्त्यांना केलं.
फडणवीसांना सुनावलं ( Raj Thackeray)
या भाषणात राज ठाकरेंनी राम मंदिरातील दानअपहार प्रकरण, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याची घटना यांसह विविध मुद्यांवरुन सरकारवर हल्लाबोल केला. “मिसिंग लिंकवर खांब कोसळला. पाणी येतंय. म्हणे त्याचं राजकारण करू नका. अरे वा. त्याच्यावर बोललं तर राजकारण. इतके दिवस तुम्ही काय करत होता. दुसऱ्यांचं सरकार असताना तुम्ही काय करत होता. त्यावेळी आंदोलन झाली ते राजकारण नव्हतं” अशा कडक शब्दांत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं.
हेही वाचा : Dhamaal 4 Advance Booking : ‘टोटल धमाल’ चा रेकॅार्ड Dhamaal 4 मोडणार? Advance Booking मध्ये झाली इतकी कमाई






