Dhruv Jurel Catch : ध्रुव जुरेल बनला सुपरमॅन! हवेत उडी मारून एका हाताने टिपला शानदार कॅच, फलंदाजही झाला अवाक्, पाहा VIDEO
Dhruv Jurel Catch : वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात ध्रुव जुरेलने हेन्री निकोल्सचा शानदार झेल घेतल्याने, टीम इंडियाला न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात मोठे यश मिळाले.

Dhruv Jurel stunning one handed catch video viral : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात ध्रुव जुरेलच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे डोळे दिपवले. शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करताना जुरेलने हवेत पुढे झेपावत एका हाताने असा काही अद्भुत झेल टिपला की, स्टेडियममधील प्रेक्षकांसह खेळाडूही थक्क झाले. पहिल्या डावात नाबाद १७५ धावांची झुंजार खेळी करत भारताला जेरीस आणणाऱ्या हेन्री निकोल्सला दुसऱ्या डावात अवघ्या ३१ धावांवर बाद करण्यात जुरेलच्या या झेलने मोलाची भूमिका बजावली.
प्रसिध कृष्णाची अचूक रणनीती अन् जुरेलचा अफलातून झेल –
दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी हेन्री निकोल्सविरुद्ध खास रणनीती आखत राउंड द विकेट मारा केला, ज्यामुळे त्याला धावा काढणे कठीण झाले. डावाच्या २३ व्या षटकात प्रसिध कृष्णाने टाकलेला चेंडू निकोल्सने लेग साइडला वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटची आतील कड घेऊन पॅडवर आदळला आणि हवेत उडाला. शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या जुरेलने चेंडू खाली पडताना पाहताच क्षणाचाही विलंब न लावता उजव्या हाताने हवेत सूर मारत तो अशक्यप्राय झेल पूर्ण केला.
जुरेलचा झेल पाहून हेन्री निकोल्सही झाला अवाक् –
Dhruv Jurel channeling his inner Eknath Solkar to pull off that absolute screamer! 😵
Watch the HERO VIDA India Tour of New Zealand, 1st Test Day 4, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.
#SonySportsNetwork #SonyLIV #NZvIND https://t.co/JB9nxOld2x
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 22, 2026
ध्रुव जुरेलने जमिनीपासून अवघ्या काही इंचांवर हा झेल टिपल्याचे पाहताच फलंदाज हेन्री निकोल्स पूर्णपणे अवाक् झाला. आपला डाव संपुष्टात आल्याचे लक्षात येताच निकोल्सने निराशेने मान मागे झुकवली आणि तंबूचा रस्ता धरला. भारतासाठी ही विकेट अत्यंत निर्णायक ठरली, कारण पहिल्या डावात याच फलंदाजाने भारतीय गोलंदाजांना चांगलेच सतावले होते.
फलंदाजीतही ध्रुव जुरेलची ७८ धावांची आक्रमक खेळी –
🚨ONE-HANDED STUNNER BY DHRUV JUREL 🚨
Absolutely unbelievable catch 🫡 https://t.co/Bt8O4o1amu
— Aarya 🕊️ (@Vitamin_Vk18) November 22, 2026
या कसोटी सामन्यात केवळ फलंदाज म्हणून संधी मिळालेल्या ध्रुव जुरेलने आपल्या बॅटनेही कमाल दाखवली आहे. भारताच्या पहिल्या डावात त्याने ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७८ धावांची आक्रमक खेळी साकारत संघाला ३५० धावांची भक्कम आघाडी मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा दोन्ही आघाड्यांवर जुरेलने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.





