Suresh Dhas: “शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा देवेंद्र फडणवीस”; सुरेश धसांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
Suresh Dhas: 'दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल'

Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी येथे आयोजित फळबाग शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात विरोधकांना टोला लगावत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे. यावेळी सुरेश धस यांनी शेतकऱ्यांचा जाणता राजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचाही उल्लेख केला.
सुरेश धस म्हणाले की, “विरोधी पक्षाचे लोक कशाला हिंडत आहेत? काय गरज आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तीन जिल्ह्यांचा चार दिवसांपूर्वी दौरा केला. सोलापूर, धाराशिव आणि लातूर. साहेबांनी लातूरला स्टेटमेंट केले की, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल. केलंय का नाही? मग परत जाऊन काय ठाकरेंची जत्रा,” असे म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला.
राज्याचे मुख्यमंत्री बोललेत तुम्हाला दसरा आणि दिवाळीच्या मध्ये अकाउंटवर पैसे येणार आहेत. जे मुख्यमंत्री त्यांच्या कालावधीत दोनदा कर्जमाफी झाली, आता सुद्धा कर्जमाफी झाली. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, असं मी जबाबदारीने बोलतोय,” असे त्यांनी म्हटले. Suresh Dhas
265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
दरम्यान, राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याचा अर्थ 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे कृषि आयुक्त यांनी खरीप 2026 च्या हंगामाचा आढावा घेऊन राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला.
त्यामुळे आता या राज्यातील तालुक्यामध्ये जून ते आज पर्यंत या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीबाबत दुष्काळाबाबतच्या ट्रीगर- १ (प्रथम कळ) अनुषंगाने पंचनामे करण्यात येणार आहेत.
सर्व्हेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्र व जीपीएस कोऑडीनेट संकलन करून पिक परिस्थितीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत विहित कार्यपद्धतीची पूर्तता झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर करण्यात येणार आहे. Suresh Dhas
हेही वाचा:





