Delhi VHP Protest। बांगलादेशात दीपू चंद्रा या हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर गोंधळ उडाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून राजधानी दिल्लीत आज निदर्शने करण्यात येत आहेत. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यासाठी आज सकाळी ११ वाजल्यापासून बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर जमले. दरम्यान, बांगलादेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या, विशेषतः वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. युनूस सरकार यांनी भारतीय उच्चायुक्तांना बोलावले Delhi VHP Protest। मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या आधी बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. भारताचे उपउच्चायुक्त देखील उपस्थित होते. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव असद अल-सियाम यांनी उच्चायुक्तांना बोलावले. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील विविध भागांमध्ये बांगलादेश मिशनभोवती वाढत्या सुरक्षा चिंतेमुळे प्रणय वर्मा यांना बोलावण्यात आले. त्यांना भारतातील सर्व बांगलादेश मिशनची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यापूर्वी, १४ डिसेंबर रोजी प्रणय वर्मा यांना बोलावण्यात आले होते. त्यावेळी बांगलादेशने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सततच्या चिथावणीखोर विधानांवर चिंता व्यक्त केली. इन्कलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांच्या मारेकऱ्याला भारतात पळून जाण्यापासून रोखण्यासाठी भारताचे सहकार्य मागितले. बांगलादेशने विनंती केली की जर आरोपी भारतात घुसला तर त्याला ताबडतोब अटक करून बांगलादेशच्या ताब्यात द्यावे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीतही निदर्शने बांगलादेशात एका हिंदू तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ दोन दिवसापूर्वी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने झाली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की निदर्शने खूपच लहान आणि शांततापूर्ण होती आणि बांगलादेश उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेला कोणताही धोका नव्हता. तसेच निदर्शनात फक्त २० ते २५ तरुण सहभागी होते” अशी माहिती त्यांनी दिली. बांगलादेशात दीपूला न्याय मिळावा अशी मागणी बांगलादेशात काल दीपूच्या हत्येविरोधात हिंदू संघटना आणि अल्पसंख्याक गटांनी ढाका याठिकाणी राष्ट्रीय प्रेस क्लबसमोर निदर्शने केली. निदर्शकांनी सांगितले की दीपू निर्दोष होता आणि त्याच्यावर ईशनिंदा केल्याचा खोटा आरोप होता. यानंतर, कट्टरपंथीयांनी त्याला क्रूरपणे मारहाण केली, झाडाला लटकवले आणि नंतर जिवंत जाळले. निदर्शकांनी सांगितले की बांगलादेशातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. त्यांचा दावा आहे की या वर्षी जानेवारीपासून ५० हून अधिक गैर-मुस्लिमांची हत्या करण्यात आली आहे आणि इतर अनेकांवर ईशनिंदा केल्याचा खोटा आरोप लावण्यात आला आहे. कारखान्यातील वादामुळे दीपूची हत्या Delhi VHP Protest। ढाका ट्रिब्यूनमधील वृत्तानुसार, २७ वर्षीय दीपूचंद्र दास हे पायोनियर निटवेअर्स (बीडी) लिमिटेड या कपड्याच्या कारखान्यात फ्लोअर मॅनेजर होते. त्यांनी अलीकडेच पर्यवेक्षक पदासाठी पदोन्नतीची परीक्षा दिली होती. कारखान्याचे वरिष्ठ व्यवस्थापक साकिब महमूद यांनी सांगितले की, संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काही कामगारांनी दीपूवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कारखान्यात निषेध करण्यास सुरुवात केली. दीपूचा भाऊ अप्पूचंद्र दास यांनी सांगितले की, दीपूचे कामाच्या परिस्थिती, लक्ष्य आणि कामगारांच्या फायद्यांवरून अनेक सहकाऱ्यांशी सतत वाद सुरू होते. १८ डिसेंबर २०२५ रोजी वाद वाढला आणि कारखान्याच्या फ्लोअर इन्चार्जने दीपूला राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याला कारखान्यातून बाहेर काढून जमावाच्या ताब्यात देण्यात आले. दिपूचा मित्र हिमेल याचा अपूला फोन आला, त्याने दिपूला पोलिस स्टेशनमध्ये नेत असल्याची माहिती दिली, परंतु काही वेळातच त्याला कळले की तो मरण पावला आहे. अपू घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याला मृतदेह जळालेला आढळला.