Mohammed Kaif Rape : ‘लग्नाचे वचन, हॉटेलमध्ये संबंध अन् नंतर…’, मोहम्मद शमीच्या भावाविरुद्ध बलात्काराचा FIR दाखल
Mohammed Kaif Rape : मोहम्मद शमीचा धाकटा भाऊ आणि देशांतर्गत क्रिकेटपटू मोहम्मद कैफविरुद्ध बलात्काराचा एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Mohammed Shami Brother Cricketer Mohammed Kaif Booked In Rape Case In Lucknow : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा धाकटा भाऊ आणि देशांतर्गत क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammed Kaif) याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. लखनौमधील एका महिलेने कैफवर लग्नाचे खोटे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला असून, याप्रकरणी लखनौच्या आशियाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराचा एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. “कैफ माझ्यासोबत पतीसारखा राहत होता, आयपीएलमध्ये निवड झाल्यानंतर लग्न करण्याचे वचन दिले होते; मात्र आता त्याने लग्न करण्यास साफ नकार दिला,” असा दावा पीडितेने केला आहे.
२०२० मधील ओळख अन् लग्नाचे वचन; आयपीएल निवडीची ठेवली होती अट!
विमान वाहतूक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या महिलेने सांगितले की, २०२० मध्ये एका मित्राच्या माध्यमातून तिची कैफशी ओळख झाली आणि सोशल मीडियावरून त्यांचे संभाषण सुरू झाले. २०२३ मध्ये त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि कैफने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, त्याने आयपीएलमध्ये निवड झाल्यानंतरच लग्न करेन अशी अट घातली होती. निवड न झाल्यानंतर त्याच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि त्याने लग्नाचा विषय टाळण्यास सुरुवात केली.
उत्तर प्रदेश ते हैदराबाद एकत्र वास्तव्य; शमीने फोन करून लग्न नाकारल्याचा दावा!
मोहम्मद शमी खुद बोलें,शादी नही हो पाएंगी..
क्रिकेट प्रेमियों के लिए बड़ी खबर लखनऊ की एक लड़की ने भारतीय तेज गेंदबाज मोहम्मद शमी के भाई मोहम्मद कैफ पर रेप का आरोप लगाया है. कैफ क्रिकेटर है और घरेलू क्रिकेट खेलते हैं. उनके खिलाफ लखनऊ के ही आशियाने थाने में रेप का मुकदमा दर्ज हो… pic.twitter.com/sMUrq3job6
— Tushar Rai (@tusharcrai) September 19, 2026
पीडितेने आरोप केला आहे की, कैफ सामन्यांसाठी जिथे जायचा, तिथे तिलाही बोलवायचा. दिल्ली, कोलकाता, उत्तर प्रदेश आणि हैदराबाद अशा अनेक शहरांमध्ये ते पती-पत्नीसारखे एकत्र राहिले. सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांशी तिचे बोलणे होत होते. मात्र, लग्नाला विरोध दर्शवत खुद्द मोहम्मद शमीने (Mohammed Shami) मोठ्या भावाच्या फोनवरून संपर्क साधून ‘हे लग्न होणे अशक्य आहे’ असे स्पष्टपणे सांगितल्याचा दावा तिने केला आहे.
पॉडकास्टवरून वाद आणि शिवीगाळ; पोलीस ठाण्याबाहेरून अखेरचा फोन!
एका क्रीडा पॉडकास्टमध्ये या नात्याचा उल्लेख केल्यानंतर वाद अधिक चिघळला. कैफने तो व्हिडिओ हटवण्यास सांगितले आणि मे २०२६ मध्ये मोरादाबाद येथे भेट झाली असता कैफच्या कुटुंबीयांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप तिने केला. ३० मे २०२६ रोजी आशियाना पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे राहून तिने कैफला लग्नाबाबत शेवटचा फोन केला; मात्र त्याने नकार दिल्याने तिने थेट पोलिसांत धाव घेत गुन्हा नोंदवला.





