Arjun Tendulkar Bid : अर्जुन तेंडुलकर झाला मालामाल! टी-२० मुंबई लीगच्या लिलावात ‘या’ संघाने पाडला पैशांचा पाऊस
Arjun Tendulkar Bid : अर्जुन तेंडुलकर दोन लाख रुपयांच्या मूळ किमतीसह मुंबई लीगच्या लिलावात उतरला होता, त्याच्यावर मोठी बोली लागली आहे.

Arjun Tendulkar Bought by ARCS Andheri for 10 Lakh : क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरचा सुपुत्र अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरला आता टी-२० मुंबई लीगमध्ये मोठी बोली लागली आहे. त्याला ‘एआरसीएस अंधेरी’ संघाने आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
लिलावात लागली मोठी बोली –
टी-२० मुंबई लीगच्या ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकर यांच्यावर जोरदार बोली लागली. त्याने २ लाख रुपयांच्या मूळ किमतीसह केला होता, मात्र त्याची किंमत पाच पटीने वाढून १० लाख रुपयांवर पोहोचली. अखेर ‘एआरसीएस अंधेरी’ या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतले. २६ वर्षीय अष्टपैलू खेळाडू अर्जुन आता शिवम दुबेसोबत ड्रेसिंग रूम शेअर करताना दिसणार आहेत. शिवम दुबेला या संघाने २० लाख रुपयांत रिटेन केले आहे, तर मुशीर खानला ११ लाख रुपयांत खरेदी केले आहे.
Arjun Tendulkar was picked up for INR 10 lakh and will represent ARCS Andheri in the 2026 T20 Mumbai League season.#ArjunTendulkar #T20MumbaiLeague #CricTracker pic.twitter.com/RnsAyMYYb0
— CricTracker (@Cricketracker) May 2, 2026
विशेष म्हणजे, अर्जुन तेंडुलकर हा २०२२-२३ च्या हंगामापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) नियमांनुसार, एक खेळाडू आयपीएलव्यतिरिक्त एकाच लीगमध्ये खेळू शकतो. मात्र, एमसीएने त्याला या लीगमध्ये खेळण्यासाठी विशेष परवानगी दिली आहे. सिद्धांत अधतरावलाही अशीच सूट देण्यात आली आहे.
जूनमध्ये लीगचा शुभारंभ –
टी-२० मुंबई लीगचा शुभारंभ जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२६ संपल्यानंतर लगेचच ही स्पर्धा सुरू होईल. आयपीएलमध्ये संधी न मिळाल्यामुळे अर्जुन यांच्यासाठी ही स्पर्धा स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी मानली जात आहे.





