Anna Hazare : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबाबत मोठी अपडेट
Anna Hazare : अण्णा हजारे (८९) यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Anna Hazare : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना मूत्रपिंडाचा संसर्ग झाल्याचे रक्ताच्या तपासणीतून स्पष्ट झाल्यानंतर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सल्लागार डॉक्टर गौतम भन्साली यांनी मंगळवारी दिली. (Anna Hazare)
अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर ८९ वर्षीय हजारे यांना सोमवारी रात्री दक्षिण मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या रक्ताच्या अहवालात मूत्रपिंडाचा संसर्ग आढळल्याचे सहकारी दत्ता आवारी यांनी सांगितले. (Anna Hazare)
गेल्या आठवड्यातही हजारे यांना अहिल्यानगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची सविस्तर तपासणी करत आहेत. (Anna Hazare)
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हजारे यांनी ग्रामीण विकास, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०११ मधील त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन देशव्यापी ठरले होते. (Anna Hazare)





