Ambadas Danve : “आता ‘ऑपरेशन टायगर’ होणार नाही”; अंबादास दानवेंनी व्यक्त केला विश्वास; कारणही सांगितले…
Ambadas Danve : ठाकरेंच्या शिवसेनेतील २० पैकी १४ आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा

Ambadas Danve : शिंदे सेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने 6 खासदार फोडले. आता खासदारानंतर आमदार देखील फुटणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदाराने केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ( Ambadas Danve )
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील २० पैकी १४ आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. यानंतर आता ‘ऑपरेशन टायगर’बाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Ambadas Danve)
दानवे धाराशिव दौऱ्यावर आले असता माध्यामांसोबत चर्चा करताना सांगितले की, “कुणाची कितीही इच्छा असली तरी यावेळी ‘ऑपरेशन टायगर’ होणार नाही. खासदार फुटले त्यावेळी संख्येचे गणित वेगळे होते. मात्र, आता आमदारांच्या संख्येचे गणित वेगळे असून ते गाठता येणार नाही.” (Ambadas Danve)

Ambadas Danve : “आता ‘ऑपरेशन टायगर’ होणार नाही”; अंबादास दानवेंनी व्यक्त केला विश्वास; कारणही सांगितले…
तसेच, शिवसेना ठाकरे गट आता कारवाईच्या पवित्र्यात असून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहितीही अंबादास दानवे यांनी दिली.
दरम्यान, शिंदेसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून हे आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा केला होता. आमदारांनंतर ठाकरे गटातील नगरसेवक देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे संकेतही दिले होते. (Ambadas Danve)
हेही वाचा:
Homemade Chutney Recipes: पराठा असो वा डोसा, चटणी हवीच! घरच्या घरी बनवा १० झटपट आणि भन्नाट चटण्या





