Gautam Gambhir Lawsuit : टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव! नेमकं काय आहे प्रकरण? घ्या जाणून

Gautam Gambhir Lawsuit : गौतम गंभीरने दिल्ली उच्च न्यायालयाच्या कमर्शियल डिव्हिजनमध्ये १६ इंस्टाग्राम अकाउंट्स आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Updated On:
Gautam Gambhir Lawsuit : टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरची दिल्ली उच्च न्यायालयात धाव! नेमकं काय आहे प्रकरण? घ्या जाणून

Gautam Gambhir Lawsuit Delhi High Court : टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर सध्या सोशल मीडियावरील ‘फेक न्यूज’मुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत. एआय (AI), फेस स्वॅपिंग आणि व्हॉईस क्लोनिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गंभीरच्या नावाने बनावट व्हिडिओ तयार केले जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत गौतमने दिल्ली उच्च न्यायालयाच्या कमर्शियल डिव्हिजनमध्ये १६ इंस्टाग्राम अकाउंट्स आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? Gautam Gambhir Lawsuit

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, २०२५ च्या अखेरीपासून यूट्यूब, एक्स (ट्विटर), इंस्टाग्राम आणि फेसबुकवर त्याच्या नावाने बनावट डिजिटल कंटेंट तयार केला जात आहे. विशेष म्हणजे, गंभीरने कधीही न दिलेली विधाने त्याच्या तोंडी दाखवली जात आहेत. एका बनावट व्हिडिओमध्ये गंभीरने पदाचा राजीनामा दिल्याचे दाखवण्यात आले होते, ज्याला तब्बल २९ लाख व्ह्यूज मिळाले. तर दुसऱ्या एका क्लिपमध्ये तो वरिष्ठ क्रिकेटपटूंवर टीका करत असल्याचे भासवले गेले, जे पूर्णतः असत्य होते.

या अकाउंट्सवर ओढवली संक्रांत – Gautam Gambhir Lawsuit

Gautam Gambhir Lawsuit Delhi High Court

गौतम गंभीरचा दिल्ली उच्च न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा

गंभीरने JanKey Frames, Bhupendra Paintola, Legends Revolution, cricket_memer45, GemsOfCrickets यांसारख्या अनेक प्रसिद्ध हँडल्सवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “माझे नाव, चेहरा आणि आवाजाचा वापर करून हे लोक पैसे कमवत आहेत आणि माझी प्रतिमा मलीन करत आहेत,” असे गंभीर यांनी न्यायालयात सांगितले.

हेही वाचा – Dinesh Karthik Baby : दिनेश कार्तिकच्या घरी अवतरली ‘परी’! दोन जुळ्या मुलांनंतर पत्नी दीपिकाने दिला मुलीला जन्म; पाहा काय ठेवलंय नाव?

त्याने या सर्व अकाउंट्सवरून बनावट मजकूर हटवण्याची आणि २.५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. गौतम गंभीरच्या या पावलामुळे सोशल मीडियावर विनाकारण अफवा पसरवणाऱ्यांना मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.Gautam Gambhir Lawsuit

आणखी संबंधित बातम्या

Sanju Samson : 'संजूला धोनी व्हायची गरज नाही, तो स्वतःमध्ये खास...!' गंभीरने थरूर यांना कसं रोखलं? सॅमसनबद्दलचा जुना किस्सा व्हायरल

2026-03-19 21:17:24

Sanju Samson : 'संजूला धोनी व्हायची गरज नाही, तो स्वतःमध्ये खास...!' गंभीरने थरूर यांना कसं रोखलं? सॅमसनबद्दलचा जुना किस्सा व्हायरल

Vaibhav Suryavanshi : IPL 2026 पूर्वीच वैभव सूर्यवंशीचा जलवा! रवींद्र जडेजाची धुलाई करत प्रतिस्पर्धी संघांना दिला इशारा, पाहा VIDEO

2026-03-19 19:40:34

Vaibhav Suryavanshi : IPL 2026 पूर्वीच वैभव सूर्यवंशीचा जलवा! रवींद्र जडेजाची धुलाई करत प्रतिस्पर्धी संघांना दिला इशारा, पाहा VIDEO

Nathan Ellis Ruled Out : आयपीएल २०२६ पूर्वी CSK ला मोठा धक्का! स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून पडला बाहेर; धोनीच्या ताफ्यात खळबळ

2026-03-19 19:11:44

Nathan Ellis Ruled Out : आयपीएल २०२६ पूर्वी CSK ला मोठा धक्का! स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून पडला बाहेर; धोनीच्या ताफ्यात खळबळ

Riyan Parag statement : 'संजू भाईंना रिप्लेस करणं अशक्य...!' सॅमसनबद्दल बोलताना रियान भावूक; 'रो-को'चा उल्लेख करत जिंकली मनं

2026-03-19 18:37:23

Riyan Parag statement : 'संजू भाईंना रिप्लेस करणं अशक्य...!' सॅमसनबद्दल बोलताना रियान भावूक; 'रो-को'चा उल्लेख करत जिंकली मनं

Dinesh Karthik Baby : दिनेश कार्तिकच्या घरी अवतरली 'परी'! दोन जुळ्या मुलांनंतर पत्नी दीपिकाने दिला मुलीला जन्म; पाहा काय ठेवलंय नाव?

2026-03-19 16:31:54

Dinesh Karthik Baby : दिनेश कार्तिकच्या घरी अवतरली 'परी'! दोन जुळ्या मुलांनंतर पत्नी दीपिकाने दिला मुलीला जन्म; पाहा काय ठेवलंय नाव?