Ajit Pawar : लाडक्या ‘दादा’ला जनसागराने दिला अखेरचा निरोप; अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, VIDEO

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.

Updated On:

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण बारामतीत जनसागर लोटल्याचे पाहायला मिळाले. सध्या बारामती ही शोकसागरात बुडाली असून शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या निधनानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिले.

अजित पवार यांनी अनेक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आणि राज्य सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली. पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः बारामतीमध्ये, त्यांच्या प्रभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या पवार यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

भीषण अपघाताने लोकनेता हिरावला…

काल सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. विमान थेट जवळच्या शेतात जाऊन आदळले आणि एकामागून एक स्फोट झाले. यामध्ये लोकप्रिय नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासह इतर पाच जणांना काळाने हिरावले. या वृत्ताने राज्याला मोठा धक्का बसला. राज्यातील अनेकांनी थेट बारामती आणि काटेवाडीकडे धाव घेतली. आता अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ajit Pawar : भर सभेत कार्यकर्त्याला झापलं, पण नंतर खांद्यावर हात ठेवून विचारलं, 'चिडला का माझ्यावर?'; दादांच्या मायेचा 'तो' किस्सा

2026-01-30 01:15:52

Ajit Pawar : भर सभेत कार्यकर्त्याला झापलं, पण नंतर खांद्यावर हात ठेवून विचारलं, 'चिडला का माझ्यावर?'; दादांच्या मायेचा 'तो' किस्सा

Ajit Pawar : धक्कादायक! अजित पवारांच्या कट्टर कार्यकर्त्याचे हार्ट अटॅकने निधन

2026-01-29 22:50:04

Ajit Pawar : धक्कादायक! अजित पवारांच्या कट्टर कार्यकर्त्याचे हार्ट अटॅकने निधन

Supriya Sule Video : एकीकडे अजित पवारांचं निधन तर दुसरीकडे सुप्रिया सुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर; नेमकं काय घडलं?

2026-01-29 20:07:14

Supriya Sule Video : एकीकडे अजित पवारांचं निधन तर दुसरीकडे सुप्रिया सुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर; नेमकं काय घडलं?

Pawar Family Politics : 'राज्यात सुनेत्रा पवार, केंद्रात सुप्रिया सुळे'; अजितदादांच्या निधनानंतर 'या' केंद्रीय मंत्र्यांची पहिली ऑफर

2026-01-29 19:24:02

Pawar Family Politics : 'राज्यात सुनेत्रा पवार, केंद्रात सुप्रिया सुळे'; अजितदादांच्या निधनानंतर 'या' केंद्रीय मंत्र्यांची पहिली ऑफर

Shashikant Shinde : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे सूचक विधान

2026-01-29 19:04:00

Shashikant Shinde : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे सूचक विधान