Supriya Sule Video : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026रोजी बारामती विमानतळाजवळील भीषण विमान अपघातात निधन झाले. 66 वर्षीय अजित पवार हे शरद पवारांनंतर राष्ट्रवादीत खंदे नेतृत्व आणि ‘लोकनेता’ म्हणून ओळखले जात होते. त्यांचे राजकीय नेतृत्व ऐन उमेदीच्या काळात फुलू लागले होते, पण अकाली एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळ हादरले आहे. आज सकाळी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात आणि पूर्ण राजकीय सन्मानाने अजित पवार यांचे अंत्यसंस्कार पार पडले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, प्रफुल पटेल यांसह देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. बारामती आणि परिसरातील लाखो जनसागराने ‘दादा’ला अखेरचा निरोप दिला. “अजित दादा अमर रहे” अशा घोषणांनी संपूर्ण मैदान गजबजले होते. क्या फर्क पड़ता है कौन कहां किस पंक्ति में बैठा है ? pic.twitter.com/QD4sqj8Wb8 — राजस्थानी ट्वीट (@8PMnoCM) January 29, 2026 सुप्रिया सुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर (Supriya Sule Video) अंत्यसंस्कारावेळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात सुप्रिया सुळे ((Supriya Sule Video) कुटुंबाला आधार देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे सुनैत्रा पवार यांचा हात धरून त्यांना पार्थिवापर्यंत नेताना दिसत आहेत. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांनाही त्या भावनिक आधार देत होत्या. दुसऱ्या भागात सुप्रिया सुळे बसण्याच्या रांगेत बदल करताना दिसत आहेत. मागे बसलेल्या काही मुलींना (त्यांच्यात त्यांची मुलगी रेवती सुळेही असल्याचे दिसते) पुढे बसण्याची सूचना देताना दिसत आहेत. Ajit Pawar या व्हिडिओवर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी सुप्रिया सुळे यांच्या या कृतीचे कौतुक केले आहे. “भावाच्या निधनाचे दुःख पचवून त्या कुटुंबाचा आधारवड ठरल्या”, “पवार कुटुंब एकत्र राहिले याचे प्रतीक” अशा पोस्ट्स आहेत. मात्र, काहींनी टीका केली आहे. “अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात इतके मायक्रो-मॅनेजमेंट कशासाठी?”, “बॉस लेडी सारखे वागत आहेत” असे आरोप केले जात आहेत. यामुळे “सुप्रिया सुळे पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत का?” अशी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गट (अजित गट आणि शरद गट) विलीनीकरण होण्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे या महत्त्वाची भूमिका बजावू इच्छित असल्याचे काहींचे मत आहे. पवार कुटुंबातील सर्व भावंडांमध्ये सुप्रिया सुळे सर्वात मोठ्या आहेत. पक्ष फुटल्यानंतरही कुटुंब एक राहिले. अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसले. अजित पवारांच्या अकाली निधनाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या दु:खाच्या प्रसंगात सुप्रिया सुळे पुढाकार घेताना दिसल्या, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही चर्चा रंगल्या आहेत. हे पण वाचा : Pawar Family Politics : ‘राज्यात सुनेत्रा पवार, केंद्रात सुप्रिया सुळे’; अजितदादांच्या निधनानंतर ‘या’ केंद्रीय मंत्र्यांची मोठी ऑफर