धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा श्रीगोंद्यात निषेध

भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

श्रीगोंदा  – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिंतूर येथे आयोजित शिवस्वराज्य यात्रेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाषणादरम्याम माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे दुखावलेल्या पाचपुते समर्थकांनी मुंडे यांचा निषेध करीत भाजपच्या वतीने तहसीलदार महेंद्र माळी यांना निषेध निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, ज्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिले. त्या पाचपुतेंसंदर्भात मुंडे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून खालच्या भाषेत जाहीर सभेत टीका केली. पाचपुते यांच्या वयाचे व कर्तृत्वाचे भान न राहता बोलणं म्हणजे संतुलन बिघडल्याने लक्षण आहे. पातळी सोडून बोलणाऱ्या मुंडे यांचा आम्ही निषेध करून पुतळा जळणार आहोत.

सभापती शाहजी हिरवे, बापूसाहेब गोरे, शिवसेना तालुका प्रमुख भाऊसाहेब गोरे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदिप नागवडे, एम. डी. शिंदे, शिवसेना शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस, मिलिंद दरेकर, संतोष खेतमाळीस, नगरसेवक संग्राम घोडके, अंबादास औटी, संतोष क्षीरसागर, रमेश लाढाणे, सुधीर खेडकर, महावीर पटवा, प्रतिभा झिटे, राजेंद्र उकांडे, निकेतन सकट, काका कदम, विजय शेलार, महेश क्षीरसागर आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

माफी नाही तोपर्यंत पाऊल ठेवू देणार नाही

जोपर्यंत धनंजय मुंडे हे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची जाहीर माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांना भाजप पदाधिकारी व श्रीगोंदेकर मतदारसंघात पाऊल ठेऊ देणार नसल्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदनात दिला आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभेच्या तोंडावर हा वाद चिघळण्याची शक्‍यता आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.