Ashadhi Wari Toll Free । राज्यभरातून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व टोल वारकऱ्यांसाठी माफ असणार आहेत. ३ जुलैपासून ते २१ जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे. यासंदर्भात राज्य सरकाच्या वतीने जीआर देखील काढण्यात आला आहे. अक्षय महाराज भोसले यांनी देखील या टोलमाफीच्या निर्णयाची माहिती दिली आहे. पथकर नाक्यावर वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी असं शासन निर्णयात म्हटलं आहे. परिवहन विभागातून वाहनांना आवश्यक स्टिकर्स Ashadhi Wari Toll Free । पंढरपूरला आषाढी कार्तिकी निमित्त जाणाऱ्या व परत येणाऱ्या पालख्या व वाहनांना पथ करतून सूट. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांना परिवहन विभागातून आवश्यक स्टिकर्स दिले जाणार. 3 जुलै ते 21 जुलै दरम्यान या कालावधीत ही सवलत राहणार आहे. अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्याही सूचना Ashadhi Wari Toll Free । गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्याही सूचना. महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्याांवर उपरोक्त कालावधीत पथकर माफी करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सूट देण्याच्याही सूचनाही देण्यात आल्या आहेत. हेही वाचा अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिकांची उपस्थिती; महायुतीत खडाजंगी होण्याची शक्यता