अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिकांची उपस्थिती; महायुतीत खडाजंगी होण्याची शक्यता

Nawab Malik| विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी काल देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला नवाब मलिक यांनी हजेरी लावल्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुकीपूर्वी मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बैठकीला उपस्थिती लावल्याने अजित पवार यांना नवाब मलिक यांनी पाठींबा दिल्याची चर्चा आता रंगली आहे. याआधीही हिवाळी अधिवेशनापूर्वी नवाब मलिक यांची ईडीच्या कोठडीतून सुटका झाल्यानंतर ते थेट सत्ताधारी बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी देखील नवाब मलिक अजित पवार गटात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. Nawab Malik|
देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य ठरणार नाही, असे म्हटले होते. मात्र यानंतर आता नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Nawab Malik|
दरम्यान, नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे अटकेत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक यांची जामीनावर सुटका झाली होती. मात्र नवाब मलिक बैठकीला उपस्थित राहिल्याने अजित पवार भाजपच्या विरोधात जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. Nawab Malik|
हेही वाचा:
राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआउट ; पंतप्रधान मोदी म्हणाले ,”खोटं पसरवणाऱ्यांना सत्य ऐकू येत नाही”





