Last day of the Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुपारी पत्रकार परिषद
Last day of the Budget Session : आज 25 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. त्यानंतर दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे.

Last day of the Budget Session : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (25 मार्च 2026) शेवटचा दिवस आहे. आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाले आहे. राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च 2026 रोजी सादर करण्यात आला. अधिवेशनाचा कालावधी 31 दिवसांचा राहिला. वास्तविक कामकाजाचे दिवसांमध्ये 11 सुट्ट्या वगळता सुमारे 20 ते 21 दिवस कामकाज सुरू होते.
महाराष्ट्राचा 2026-27 चा अर्थसंकल्प 6 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. एकूण 7,79,467 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचे मुख्यत्वे शेती, पायाभूत सुविधा, महिलांचे सक्षमीकरण, हरित ऊर्जा आणि 2047 पर्यंत राज्याला 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टिकोनावर आधारित आहे
अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या. यामध्ये सरकारने 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज माफीची मोठी घोषणा केली. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, त्याचे निकष कसे असणार यामध्ये स्पष्टता नव्हती. त्यामुळे विरोधकांनी यावर टीका केली. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना रक्कमेत वाढ करण्यात आली नाही. ती पुढील काळातही सुरू ठेवली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी केलेल्या सर्वच आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देतील.
दुपारी पत्रकार परिषद
अशोक खरात प्रकरण, कायदा व सुव्यवस्था, शेतकरी तसेच अजितदादांचं अपघाती निधन या सर्वच मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान, सभागृहातील भाषणांनंतर मुख्यमंत्र्यांची दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषदही पार पडणार असल्याची माहिती आहे.





