आरोपीशीच लग्न करायचं; बलात्कार पीडितेची सर्वोच्च न्यायालयात धाव

थिरुअनंतपुरम – काही दिवसांपूर्वीच एका तरुणीचा तिच्या पतीनेच खून केल्याची घटना समोर आली होती. आरोपी पतीवर त्या तरुणीचा बलात्कार केल्याचा आरोप होता. त्यामुळे त्याला तुरुंगातही जावं लागलं होतं. मात्र तरुणीशी लग्न करून त्याने शिक्षेपासून बचाव केला. मात्र लग्न करून आरोपीने पत्नीला ठार केलं. आता केरळमध्ये एका बलात्कार पीडितेला आरोपीशी लग्न करण्याचं आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीला न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. आता याच आरोपीशी लग्न करण्यासाठी पीडितेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पीडित तरुणीने आरोपीला जामिनावर सोडावे अशी मागणी केली आहे.
केरळमध्ये रॉबिन वडक्कुमचेरी या व्यक्तीने 2018 साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. बलात्कारानंतर पीडित मुलीने एका बाळालाही जन्म दिला होता. आरोपी रॉबिनवर कारवाई झाल्यानंतर पीडितेने सांगितले की शरीरसंबंधासाठी आपली संमती होती. परंतु पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई केली होती.





