बारामती, (प्रतिनिधी)- झारगडवाडी येथील शासकीय गायरान २१ एकर क्षेत्र उपबाजार आवाराकरीता समितीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे विनामूल्य मिळाले आहे. त्याठिकाणी ही समिती उपबाजार विकसित करणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पवार यांनी दिली. सर्व सुविधेमुळे बाजार समितीचा नावलौकीक वाढत आहे. भविष्यात ही आणखी उपक्रम राबविणेचा समितीचा मानस आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन २०२३-२०२४ ची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्य आवार येथे माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे यांच्या प्रमुख्य उपस्थितीत व बाजार समितीचे सभापती सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बारामती बाजार समितीचे विकास व विस्तारामध्ये तालुक्याचे आमदार म्हणून अजित पवार पवार यांचे मोठे योगदान आहे असे मत बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केले. बारामती बाजार समितीमध्ये राबविलेले विविध उपक्रम व शेतमाल खरेदी विक्री व्यवस्थेसाठी आवारात असलेल्या सुविधा यामुळे राज्यातील ३०६ बाजार समित्यामध्ये बारामती बाजार समितीला प्रथम क्रमांक मिळाला यांचे सर्व श्रेय समितीचे सभापती व संचालक मंडळ, सचिव व माजी संचालक मंडळ तसेच सेवक यांना जात असल्याचे मदन देवकाते यांनी सांगितले. यावेळी समितीतर्फे उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकरी, आडतदार, खरेदीदार, हमाल, मापाडी, सेवकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मुख्य यार्डमधील व्यापारी अरविंद वीर, अशोक भळगट,वैभव शिंदे, सिद्धार्थ गुगळे, निलेश भिंगे, जळोची येथील फळे व भाजापाला आडतदार सुनील होले, इम्रान बागवान, प्रशांत जंजिरे, संतोष बोद्रे , अक्षय चल्हाण व सुपे उपबाजार येथील आडदार व खरेदीदार पांडुरंग चांदगुडे, रमणलाल तेली यांनी शेतमालाची खरेदी विक्री मध्ये उच्चतम काम केल्याने आणि भुसार, लिंबु, कांदा, फळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी माऊली भापकर, रमेश यादव, सत्येंद्रराजे निबंळाकर, गणेश ढवाण, भीमराव लोखंडे, फत्तेशिंग गोंडगे, रेशीम कोष शेतकरी कुंडलीक वाघमारे या शेतक-यांनी शेतीमध्ये जादा उत्पादन व त्यांचे शेतमालास जादा दर मिळाल्याने आणि समितीचे सेवक सूर्यकांत भगवान मोरे, निरीक्षक यांनी उत्कृष्ट काम केल्याने तसेच हमाल बाळासाहेब जाधव व मापाडी संभाजी शितोळे यांना उत्कृष्ट कामगिरीमुळे समितीतर्फे सन्मानचिन्ह, देऊन सत्कार करण्यात आला. सभेचे अहवाल वाचन समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले. यावेळी पोपटराव गावडे, सचिन सातव, राजेंद्र गावडे, धनवान वदक, अशोक नवले, अशोकराव जगताप, अशोकराव मुळीक, वसंतराव तावरे, नारायण कोळेकर, अनिल आटोळे, बाळासो परकाळे, समितीचे सदस्य विनायक गावडे, बापूराव कोकरे, रामचंद्र खलाटे, दयाराम महाडीक, सतिश जगताप, प्रतिभा परकाळे, शोभा कदम, शुभम ठोंबरे, विश्वास आटोळे, अरूण सकट, युवराज देवकाते, मिलिंद सालपे, संतोष आटोळे, नितिन सरक, समितीचे माजी सभापती, उपसभापती, सदस्य, शेतकरी, व्यापारी, आदी मान्यवर उपस्थित होते. उपसभापती निलेश लडकत यांनी आभार मानले. जळोचीतील भाजीपाला हाताळणीचे काम पूर्ण यावेळी सभापती पवार म्हणाले की, बारामती बाजार समितीने १९३५ चे स्थापनेपासून समितीची वाटचाल व विकास आणि पुरविलेल्या सुविधा तसेच उपक्रम आणि समितीची उलाढाल व उत्पन्नात झालेली वाढ याचा संपूर्ण कामाजाचा आढावा प्रास्तविकात मांडला. समितीने सुपे येथे शासकीय ७ हे. ०३ क्षेत्र खरेदी केली आहे. त्याठिकाणी नवीन उपबाजार आवार विकसित करीत असून तेथे व्यापारी गाळे, सेलहॉल, कर्मशिअल गाळे, दोन टॉयलेट ब्लॉक या कामांची सुरूवात लवकर करीत आहोत. मुख्य आवारात रेशीम कोष खरेदी विक्री प्रकल्प इमारतीकरिता शासनाकडुन १७.५ कोटी रुपये मंजूर झाला आहे. इमारतीचे बांधकाम सुरू आहे. जळोची उपबाजार येथे ऑफीस इमारत व १६ गाळे आणि मॅग्नेट प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे.