tirupati laddu controversy : तिरुपतीच्या प्रसादावर विश्वास कायम; चार दिवसांत तब्बल ‘इतके’ लाख लाडू विकले गेले, आकडा पाहून उडतील होश !

tirupati laddu controversy – तिरुपती मंदिरातील प्रसादातील (लाडू) भेसळीच्या मुद्द्यावरून देशभरात जोरदार राजकारण सुरू आहे. लाडूतील भेसळीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. पण लोकांची भगवान व्यंकटेश्वराच्या प्रसादावरची श्रद्धा पूर्वीसारखीच असल्याचे दिसते.
तिरुपती मंदिरातील लाडूंची विक्री याची साक्ष आहे. लाडूंमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतरही विक्रीत विशेष फरक दिसला नाही. गेल्या 4 दिवसांत जवळपास 14 लाख लाडूंची विक्री झाली आहे.
तिरुपती मंदिरात मित्र आणि नातेवाईकांना लाडू भेट देण्याची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. दररोज 15 टन गाईचे तूप लाडू बनवण्यासाठी वापरले जात आहे. मंदिरात दररोज 3 लाखांहून अधिक लाडू बनवले जात असून जवळपास तेवढेच लाडूही विकले जात आहेत.
तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल वापरण्यात आल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. प्रसादात भेसळ करून हिंदूंच्या श्रद्धेला तडा गेल्याचा आरोप केला जात आहे.
भेसळीवर ज्योतिर्मठचे शंकराचार्य संतापले
प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याच्या घटनेवर उत्तराखंडमधील ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी टीकास्त्र सोडले असून त्यासाठी संपूर्ण मंदिर प्रशासनाला जबाबदार धरले आहे. आपल्या देशव्यापी गोरक्षण यात्रेसाठी सोमवारी लखनौला पोहोचलेल्या सरस्वती यांनी प्रश्नाला उत्तर.
ते म्हणाले, एवढी मोठी घटना घडली आहे.. तिरुपती मंदिराचे विश्वस्त, अधिकारी, नियुक्त वरिष्ठ अधिकारी, हे सर्व दोषी आहेत. तपासात तिसरी व्यक्ती समोर आली तरी प्रथमदर्शनी सर्वजण दोषी आहेत. सध्या त्यांना विधाने करून दाखविण्याचा अधिकार नाही, कारण ते जबाबदार पदावर असताना हे सर्व घडले आहे.
कोणत्या दिवशी किती लाडू विकले गेले?
लाडू विक्रीची तारीख / क्रमांक
19 सप्टेंबर 2024- 3.59 लाख
20 सप्टेंबर 2024 – 3.17 लाख
21 सप्टेंबर 2024 – 3.67 लाख
22 सप्टेंबर 2024 – 3.60 लाख





