अरूणाचल प्रदेश : आमदार तिरोगं अबो यांच्यासह 11 जणांची हत्या

नवी दिल्ली – अरूणाचल प्रदेश राज्यातील तिराप जिल्ह्यात उग्रवाद्यांनी मुख्यमंत्री काॅनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार तिरोंग अबो यांच्यासह 11 जणांची हत्या केली आहे. या हल्यात आमदाराच्या सुरक्षारक्षकाला गोळी लागली असून त्याला उपचारासाठी रूग्णलयात दाखल करण्यात आहे. सुरक्षारक्षकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

या हल्यामागे एनएससीएन उग्रवादी संघटनेचा हात असल्याचं संशय व्यक्त केला जात आहे, मात्र अधिकृतपणे यासंबंधी माहिती मिळालेली नाही.

अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री संगमा यांनी या घटनेबदल दु:ख व्यक्त केले आहे आणि या हल्ल्यास जबाबदार असलेल्या संघटनेविरुध्द कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

भारताचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबदल दु:ख व्यक्त केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.