Pune News : लुल्लानगर चौकात पत्रा कोसळून दोघे जखमी
Pune News : पुण्यातील कोंढवा परिसरातील गजबजलेल्या लुल्लानगर चौकात एका इमारतीलगत असलेला पत्रा अचानक कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Pune News : कोंढवा परिसरातील लुल्लानगर चौकात एका इमारतीलगत असणारा पत्रा अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. (Pune News)
इमारतीलगत असलेल्या पत्र्याचा काही भाग अचानक खाली कोसळला. त्यावेळी परिसरात असलेल्या दोन जणांना त्याचा फटका बसून ते जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune News)
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती आणि पत्रा नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली. (Pune News)





