Bjp Politics : भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा
Bjp Politics : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या राजकारणात पक्षांतराची मोठी घडामोड घडली आहे.

Bjp Politics : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पक्षबदलाची मोठी घडामोड घडली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये सहा वेळा मंत्री राहिलेले आणि माजी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम आसरे कुशवाहा यांनी भाजपचा राजीनामा देत पुन्हा समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. तब्बल १३ वर्षांनंतर त्यांची सपा में घरवापसी झाली आहे. (Bjp Politics)
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत कुशवाहा यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. पक्षप्रवेशानंतर त्यांनी अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आजही आपल्यासोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (Bjp Politics)
बसपातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात
राम आसरे कुशवाहा हे कानपूर परिसरातील असून त्यांची राजकीय कारकीर्द बहुजन समाज पक्षापासून सुरू झाली. १९९६ मध्ये सरसौल विधानसभा मतदारसंघातून ते बसपाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. सपामध्ये त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आणि ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसही राहिले. (Bjp Politics)
कुशवाहा हे उत्तर प्रदेशातील ओबीसी राजकारणातील एक महत्त्वाचे नाव म्हणून दीर्घकाळ सक्रिय राहिले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून ते एकूण सहा वेळा मंत्री राहिले आहेत. (Bjp Politics)
२०१३ मध्ये सपा सोडली, आता पुन्हा पक्षात प्रवेश
२०१३ मध्ये राम आसरे कुशवाहा समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. त्याच वर्षी त्यांना या पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षापासून वेगळे होत भाजपमध्ये प्रवेश केला. आता तब्बल १३ वर्षांनंतर त्यांनी पुन्हा समाजवादी पक्षाची वाट धरली आहे. (Bjp Politics)
कुशवाहा यांचा हा पक्षप्रवेश उत्तर प्रदेशातील २०२७ विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या काळात झाला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय पुनरागमनाची चर्चा सध्या उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या पक्षबदलाचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होईल, हे आगामी राजकीय घडामोडींवर अवलंबून राहणार आहे. (Bjp Politics)
BJP Leader : भाजपच्या लढवय्या नेत्या आशाताई बुचके यांचे निधन; जुन्नर तालुक्यात सर्वत्र हळहळ






