Tilak Varma Century : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत रचला इतिहास! १८ वर्षानंतर मुंबईसाठी केला ‘हा’ खास पराक्रम
Tilak Varma Century : तिलकने मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करत अवघ्या ४५ चेंडूंमध्ये आपले धमाकेदार शतक पूर्ण केले.

Tilak Varma Fastest Century IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ३० व्या सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबईचा युवा फलंदाज तिलक वर्माच्या बॅटने आग ओकत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. सुरुवातीच्या पडझडीनंतर तिलक वर्माने वादळी शतक ठोकत मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील एका महान विक्रमाशी बरोबरी केली आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. पॉवरप्लेमध्येच अवघ्या ४४ धावांत मुंबईचे ३ मुख्य फलंदाज माघारी परतले होते. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या तिलक वर्माने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले. तिलकने मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करत अवघ्या ४५ चेंडूंमध्ये आपले धमाकेदार शतक पूर्ण केले.
जयसूर्याच्या १८ वर्ष जुन्या विक्रमाशी बरोबरी –
4⃣5⃣-ball Hundred 🤯
Tilak Varma, TAKE A BOW 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/cawFoZABvQ#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI | @mipaltan | @TilakV9 pic.twitter.com/JpC1WB7lHZ
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
तिलक वर्माचे हे शतक मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठरले आहे. या कामगिरीसह त्याने श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जयसूर्याने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात (२००८) ४५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. तब्बल १८-१९ वर्षांनंतर मुंबईच्या एकाही फलंदाजाला हा पल्ला गाठता आला नव्हता, जो पराक्रम आज तिलकने करून दाखवला.
संकटात बनला ‘तारणहार’ –
Innings Break!
A terrific hundred from Tilak Varma leads #MI’s turnaround to post 199/5 👏👏
Will #GT chase it down? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/cawFoZABvQ#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI | @TilakV9 pic.twitter.com/WXIQR4PTZx
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
जेव्हा मुंबईचा संघ अडचणीत होता, तेव्हा तिलकने संयमी पण आक्रमक खेळी करत धावगती कायम राखली. त्याने आपल्या डावात ७ उत्तुंग षटकार आणि ८ नयनरम्य चौकारांची बरसात केली. या शतकामुळे मुंबईने आव्हानात्मक (१९९) धावसंख्या उभी केली असून, तिलकच्या या खेळीने अहमदाबादमधील प्रेक्षकांचे डोळे दिपवले. मुंबईच्या या ‘यंग गन’ने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो भारतीय क्रिकेटचे भविष्य का मानला जातो.





